इशांत शर्माच्या शानदार प्रदर्शनाच्या जोरावर दिल्लीने रणजी क्रिकेट स्पर्धेत विदर्भवर १० विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. या विजयासह दिल्लीने बोनस गुणासह एकूण ७ गुणांची कमाई केली आहे.

दुसऱ्या डावात दिल्लीने ३०२ धावा करत चार धावांची निसटती आघाडी मिळवली. गौतम गंभीर, नितीश राणा, मनन शर्मा यांनी केलेल्या अर्धशतकी खेळी निर्णायक ठरल्या. अक्षय वाखरेने ५ बळी घेतले. दुसऱ्या डावात दिल्लीच्या भेदक गोलंदाजीसमोर विदर्भची घसरगुंडी उडाली आणि त्यांचा डाव ९८ धावांत गडगडला. इशांत, प्रदीप संगवान आणि मनन शर्मा यांनी प्रत्येकी ३ बळी मिळवले. गौतम गंभीर (४५) आणि उन्मुक्त चंद (५१) यांनी ९५ धावांचे लक्ष्य सहजपणे पेलले.
संक्षिप्त धावफलक
विदर्भ २९८ आणि ९८ विरुद्ध दिल्ली ३०२ आणि बिनबाद ९६ (गौतम गंभीर ४५, उन्मुक्त चंद ५१)
सामनावीर : मनन शर्मा

Story img Loader