नवी दिल्ली : गतहंगामात उपविजेतेपदावर समाधान मानावे लागल्यानंतर यंदा एक पाऊल पुढे जाण्यासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ उत्सुक असून आज, रविवारी होणाऱ्या महिला प्रीमियर लीग (डब्ल्यूपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या अंतिम सामन्यात त्यांच्यासमोर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुचे आव्हान असेल. हे दोनही संघ ‘डब्ल्यूपीएल’मधील आपले पहिले जेतेपद मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. शिवाय या दोनही फ्रेंचायझींच्या पुरुष संघांनाही ‘आयपीएल’मध्ये जेतेपदाने कायम हुलकावणी दिली आहे. त्यामुळे या दोनपैकी कोणत्या फ्रेंचायझीची जेतेपदाची प्रतीक्षा संपणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> IPL 2024 : गुजरात टायटन्सला मोठा धक्का! युवा खेळाडू बाईक अपघातानंतर संपूर्ण आयपीएल हंगामातून बाहेर

गेल्या वर्षी ‘डब्ल्यूपीएल’च्या पहिल्या हंगामातही दिल्ली संघाने अंतिम फेरी गाठली होती. मात्र, त्यावेळी मुंबई इंडियन्सकडून पराभूत झाल्याने त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. यंदा दिल्लीच्या संघाने आपल्या खेळाचा स्तर अधिक उंचावला आहे. साखळी फेरीत दिल्लीने आठ सामन्यांत सर्वाधिक १२ गुण मिळवले. त्यामुळे गुणतालिकेत अग्रस्थान मिळवताना त्यांनी थेट अंतिम फेरीत प्रवेश केला.

दुसरीकडे, बंगळूरुला अंतिम फेरी गाठण्यासाठी ‘एलिमिनेटर’चा सामना खेळावा लागला. या सामन्यात बंगळूरुने गतविजेत्या मुंबईचा पराभव करत जेतेपदाच्या आशा राखल्या.

वेळ : सायं. ७.३० वा.

थेट प्रक्षेपण : स्पोर्टस १८, जिओ सिनेमा

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delhi capitals vs royal challengers bangalore wpl 2024 final live streaming zws