आयपीएलमधील दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी गॅरी कर्स्टन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिकेचे ५४ वर्षीय कर्स्टन यांनी भारताला विश्वचषक मिळवून देण्यात प्रशिक्षक म्हणून मोलाचा वाटा उचलला होता. त्यांच्या कार्यकाळात भारतीय संघ कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचला होता. दिल्लीच्या संघाला आयपीएलमधून अजूनही आपली छाप पाडता आली नसल्याने त्यांना विजेतेपद मिळवून देण्याची जबाबदारी कर्स्टन यांच्यावर असेल.
कर्स्टन यांच्याशी करारबद्ध होत असताना दिल्लीच्या संघाने प्रशिक्षकाच्या यादीत कोणताच बदल केलेला नाही. एरिक सिमोन्स हे साहाय्यक प्रशिक्षक म्हणूत काम पाहतील, तर टी.ए. शेखर यांच्याकडे सल्लागार प्रशिक्षकपद कायम असेल. त्याचबरोबर फिरकी गोलंदाजीच्या सल्लागारासाठी मुश्ताक अहमद यांचे नाव चर्चेत आहे.
दिल्ली डेअरडेव्हिल्स या आयपीएलमधील संघाचे मुख्य प्रशिक्षकपद मिळाल्याचा आनंद आहे. यापूर्वी भारत आणि दक्षिण आफ्रिका या देशांचे प्रशिक्षकपद मी भूषवले आहे. संघाला बलाढय़ बनण्याची एक प्रक्रिया असते आणि त्याच प्रक्रियेचा मी अवलंब करेन. हे माझ्यासाठी नवीन आव्हान असून ते स्वीकारायला मी सज्ज आहे.
गॅरी कर्स्टन, दिल्ली डेअरडेव्हिल्सचे मुख्य प्रशिक्षक

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा