IPL मध्ये आतापर्यंत एकही विजेतेपद न मिळवलेल्या दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने आपले नाव बदलले असून आज या नावाची घोषणा करण्यात आली. त्यांनी आता आपल्या संघाचे नवीन नाव दिल्ली कॅपिटल्स असे ठेवले आहे.

त्या बरोबरच लोगोच्या डिझाईनमध्येही फरक दिसून येत आहे. आधीच्या दिल्ली संघाच्या लोगोमध्ये चेंडूचा वापर करण्यात आला होता. मात्र आता नव्या लोगोमध्ये त्यांनी आक्रमक असे वाघाचे चित्र वापरले आहे. त्यामुळे नावात बदल केल्यानंतर आता कामगिरी सुधारणार का? असा प्रश्न दिल्लीचे चाहते विचारू लागले आहेत.

Story img Loader