ऑलिम्पिकवारीसाठी न्यायालयात धाव घेतलेल्या कुस्तीपूट सुशील कुमार याला धक्का बसला आहे. दिल्ली हायकोर्टाने सुशीलची याचिका फेटाळून लावली आहे. भारतीय कुस्ती महासंघाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास हायकोर्टाने नकार दिला. सुशील कुमार हा विक्रमवीर खेळाडू आहे. पण या बळावर कुस्ती महासंघाच्या निर्णयाला आव्हान देता येऊ शकत नाही. कुस्ती महासंघाच्या निवड प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आहे. त्यात आम्हाला हस्तक्षेप करता येणार नाही, असे दिल्ली हायकोर्टाने नमूद केले.
दिल्ली हायकोर्टाच्या या निर्णयाने सुशील कुमारचा ऑलिम्पिकचा मार्ग आता बंद झाला आहे. ऑलिम्पिक पात्रतेची औपचारिकता पूर्ण केलेला नरसिंग यादव भारताचे प्रतिनिधित्व करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ७४ किलो वजनी गटात खेळणाऱ्या नरसिंगच्या निवडीला आक्षेप घेत सुशीलने निवड चाचणीची मागणी केली होती.

Story img Loader