ऑलिम्पिकवारीसाठी न्यायालयात धाव घेतलेल्या कुस्तीपूट सुशील कुमार याला धक्का बसला आहे. दिल्ली हायकोर्टाने सुशीलची याचिका फेटाळून लावली आहे. भारतीय कुस्ती महासंघाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास हायकोर्टाने नकार दिला. सुशील कुमार हा विक्रमवीर खेळाडू आहे. पण या बळावर कुस्ती महासंघाच्या निर्णयाला आव्हान देता येऊ शकत नाही. कुस्ती महासंघाच्या निवड प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आहे. त्यात आम्हाला हस्तक्षेप करता येणार नाही, असे दिल्ली हायकोर्टाने नमूद केले.
दिल्ली हायकोर्टाच्या या निर्णयाने सुशील कुमारचा ऑलिम्पिकचा मार्ग आता बंद झाला आहे. ऑलिम्पिक पात्रतेची औपचारिकता पूर्ण केलेला नरसिंग यादव भारताचे प्रतिनिधित्व करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ७४ किलो वजनी गटात खेळणाऱ्या नरसिंगच्या निवडीला आक्षेप घेत सुशीलने निवड चाचणीची मागणी केली होती.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा