आयपीएलचे माजी कमिशनर ललित मोदी यांचे पारपत्र परत करण्याचे आदेश दिल्यामुळे दिल्ली उच्च न्यायालयाने मोदी यांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे मोदी यांचा भारतात परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बादर दुरेझ अहमद आणि विभू बाकरू यांच्या खंडपीठापुढे झालेल्या सुनावणीत मोदी यांच्याविरोधातील सर्व आरोपांचे खंडन करण्यात आले असून त्यांचे पारपत्र परत करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
‘‘माझ्यावर कुणीच विश्वास दाखवला नाही. पण मी सत्य बोलतोय, हे न्यायालयाच्या आदेशाने स्पष्ट झाले आहे,’’ असे  मोदींनी ‘ट्विट’ केले.
 

Story img Loader