जाहिराती द्वारे मद्याचा उघड उघड प्रचार केल्याबद्दल आयपीएलच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघा विरुद्ध सूचना आणि प्रसारण मंत्रालयाकडे दिल्लीतील एका एनजीओने लेखी तक्रार केली आहे. “पंच, खेळाडू आणि बंगळूरू संघाच्या इतर खेळाडूंच्या टी-शर्टवर ‘रॉयल चॅलेंज’ या मद्याची जाहिरात केली आहे तसेच या टी-शर्टस् च्या उजव्या हातावर ‘वोडका’ मद्याचीही जाहिरात आहे. इतर कार्यक्रम आणि संघाच्या पत्रकार परिषदेत सुद्धा या टी-शर्ट व्दारे मद्यांची जाहिरात उघड-उघड केली जात आहे. इतर संघाच्या टी-शर्टवर कोणत्याही मद्य कंपनीची जाहिरात नाही आणि ते अशा कोणत्या मद्य कंपनीची जाहिरातही करत नाहीत.” असे हृद्य या एनजीओच्या मुख्य संचालिका मोनिका अरोरा यांनी केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्रालयाला लिहीलेल्या पत्रात नमूद केले आहे.
१९९४ च्या केबल टेलिव्हीजन नेटवर्कच्या नियमांनुसार सिगारेट, तंबाखू, मद्य आणि इतर अल्कोहोलजन्य पदार्थांची विक्री किंवा उपभोग तसेच प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या प्रोत्साहन देणा-या कोणत्याही जाहिरातीचे प्रसारण करता येत नाही.
दिल्लीतील एनजीओने केली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध तक्रार
मद्य कंपनीची उघड जाहिरात केल्याबद्दल आयपीएलच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघा विरुद्ध सूचना आणि प्रसारण मंत्रालयाकडे दिल्लीतील एका एनजीओने लेखी तक्रार केली आहे. "पंच, खेळाडू आणि बंगळूरू संघाच्या इतर खेळाडूंच्या टी-शर्टवर 'रॉयल चॅलेंज' या मद्याची जाहिरात केली आहे तसेच या टी-शर्टस् च्या उजव्या हातावर 'वोडका' मद्याचीही जाहिरात आहे.
First published on: 14-05-2013 at 06:28 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delhi ngo have a complaint against royal challengers bangalore