आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणातील आरोपी एस.श्रीशांत आणि अंकित चव्हाण यांचा जामीन रद्द करण्यासाठी दिल्ली पोलिसांकडून आज मंगळवार न्यायालयात अर्ज करण्यात आला आहे.
दिल्ली पोलिस (विशेष पथक) एस.एन.श्रीनिवासन म्हणाले, या प्रकरणी लवकरच आरोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याने श्रीशांत आणि अंकितचा जामीन रद्द करण्यासाठी अर्ज न्यायालयात करण्यात आला आहे. १० जून रोजी न्यायालयाने या दोघांचा जामीन मंजूर केला होता. सध्याच्या उपलब्ध पुराव्यांना अनुसरून या दोघांवर मोक्का अंतर्गत कारवाईही करता येण्यासारखी नाही असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
श्रीशांत सध्या जामीनावर कारागृहाबाहेर असून, तो पुन्हा क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी प्रयत्न करत आहे. पण, दिल्ली पोलिसांनी त्याचा जामीन रद्द करण्यासाठी अर्ज केल्याने श्रीशांत आणखी अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.
दिल्ली पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाची चौकशी पुढे गेली आहे. या दोन खेळाडूंवर मोक्का अंतर्गत कारवाई करता येईल इतके सबळ पुरावेही पोलिसांच्या हाती लागले आहेत.

Story img Loader