सट्टेबाजीमध्ये आपले भागीदार व राजस्थान रॉयल्सचे मालक राज कुंद्रा यांचा सट्टेबाजीत सहभाग असल्याचे निवेदन देण्याबाबत आपल्यावर पोलिसांनी दडपण आणल्याचे तसेच आपल्याला विनाकारण पाच दिवस पोलिस कोठडीत ठेवण्यात आले, असे कुंद्रा यांचे भागीदार उमेश गोएंका यांनी येथे सांगितले.
कुंद्रा यांचे नाव सट्टेबाजीत घेण्यासाठी दिल्ली पोलिसांनी आपला शारीरिक छळ करण्यात आला तसेच आपल्याला मोक्का कायद्यांतर्गत अटक करण्याची धमकीही देण्यात आली, त्यामुळेच न्यायदंडाधिकऱ्यांसमोर पोलिस सांगतील तसे निवेदन लिहावे लागले. मी दिलेले निवेदन स्वेच्छेने दिलेले नाही. पोलिसांच्या दडपणाखाली हे निवेदन द्यावे लागले, असे गोएंका यांनी येथे सांगितले.
गोएंका यांनी आपले वकील तरुण गुम्बोर यांच्या मार्फत न्याय दंडाधिकाऱ्यांसमोर अर्ज सादर केला आहे. याबाबत दिल्ली पोलिसांनी १४ जून ला आपली बाजू मांडावी आणि त्यानंतरच न्यायालय आपला निर्णय देईल, असा आदेश अतिरिक्त सत्र न्यायाधीश विनयकुमार खन्ना यांनी दिल्ली पोलिसांना दिला आहे.

Story img Loader