Delhi Cricket Team Syed Mushtaq Ali Trophy: मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये दिल्ली आणि मणिपूर यांच्यातील सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी सामन्यात शुक्रवारी (२९ नोव्हेंबर) एक मोठा वर्ल्ड रेकॉर्ड पाहायला मिळाला. या सामन्यात दिल्ली संघाच्या सर्व ११ खेळाडूंनी गोलंदाजी केली. टी-२० क्रिकेटमध्ये असे यापूर्वी कधीही घडले नव्हते. यापूर्वी कधीही टी-२० सामन्यात ९ पेक्षा जास्त गोलंदाजांचा वापर झाला नव्हता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिल्लीविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना मणिपूरने ८ गड्यांच्या मोबदल्यात १२० धावा केल्या. सामन्यात मणिपूरची धावसंख्या ४१ धावांत ६ विकेट्स अशी होती, तेव्हा कर्णधार रेक्स सिंग (२३) आणि यष्टीरक्षक अहमद शाह (३२) यांनी सातव्या विकेटसाठी ५२ धावांची भागीदारी केली. दिल्लीच्या गोलंदाजांमध्ये मयंक रावत सर्वात महागडा ठरला. त्याने ३ षटकांत ३१ धावा दिल्या.

हेही वाचा – VIDEO: क्रिकेट विश्वात पसरली शोककळा, महाराष्ट्राच्या क्रिकेटपटूचा मैदानातच मृत्यू; कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना

यष्टीरक्षक फलंदाज आर्यन अरानाने देखील या सामन्यात गोलंदाजी केली. आपल्या एका षटकात त्याने १४ धावा दिल्या. आर्यन राणा आणि हिम्मत सिंग यांनी अनुक्रमे १० आणि ११ धावा दिल्या. दिल्लीकडून हर्ष त्यागी (२/११), दिग्वेश राठी (२/११), आयुष सिंग (१/११), आयुष बडोनी (१/८) आणि प्रियांश आर्य (१/२) यांनी विकेट घेतल्या. दिल्लीचा संघ स्पर्धेत अजिंक्य आहे. याआधीच्या सामन्यांमध्ये त्यांनी जम्मू आणि काश्मीरचा ३५ धावांनी तर हरियाणाचा सहा विकेट्सने पराभव केला आहे.

हेही वाचा – Champions Trophy: “२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान…”, शाहीद आफ्रिदीने BCCI ला सुनावलं, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या मुद्द्यावरून मोठं वक्तव्य

आयुष बदोनी विकेटकीपिंग सोडून स्वत: गोलंदाजीला आला. याशिवाय आर्यन राणा, हिम्मत सिंग, प्रियांश आर्य, यश धुल आणि अनुज रावत यांनीही गोलंदाजी केली. दिल्ली संघाच्या सर्व ११ खेळाडूंनी गोलंदाजी केली पण असे असतानाही मणिपूर संघ केवळ १२० धावा करू शकला. दिल्लीकडून सर्वोत्तम गोलंदाजी दिग्वेश राठीने केली, ज्याने ८ धावांत २ विकेट घेतले. हर्ष त्यागीलाही २ विकेट मिळाले. यष्टिरक्षक आणि कर्णधार आयुष बदोनीलाही एक विकेट मिळाली.

हेही वाचा – Glenn Phillips Flying Catch: क्रिकेटमधील सर्वाेत्कृष्ट झेल? ‘सुपरमॅन’ फिलीप्सने हवेत झेप घेत टिपला अनपेक्षित कॅच, VIDEO व्हायरल

दिल्लीच्या संघाने हा सामना जिंकला पण मणिपूरने त्यांना सहज विजय मिळवू दिला नाही. दिल्ली फक्त ९ चेंडू शिल्लक असताना विजय मिळवण्यात यशस्वी ठरली आणिसंघाने ६ विकेट्स गमाल्या होत्या. दिल्लीकडून केवळ यश धुलने नाबाद ५९ धावा केल्या. दिल्लीचे बाकीचे फलंदाज संघर्ष करताना दिसले.

d

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delhi team uses 11 bowlers vs manipur in syed mushtaq ali trophy rare world record in t20 match bdg