प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर दिल्ली संघाने हिमाचल प्रदेशचा चार गडी राखून पराभव केला आणि मुश्ताक अली करंडक ट्वेन्टी२० क्रिकेट स्पर्धेत आव्हान राखले. वरुण सूदच्या अचूक गोलंदाजीमुळेच दिल्ली संघाने हिमाचल प्रदेशला २० षटकांत ७ बाद १०९ धावांवर रोखले. हिमाचल प्रदेशची एक वेळ ४ बाद ४३ अशी दयनीय स्थिती होती मात्र मधल्या फळीत हिमाचल प्रदेशच्या ऋषी धवन याने ३३ चेंडूंमध्ये ३८ धावा करीत संघास तीन आकडी धावा गाठून देण्यात यश मिळविले. पारस डोग्राने शैलीदार २५ धावा करीत संघाच्या धावसंख्येस हातभार लावला.दिल्ली संघास विजयासाठी असलेले ११० धावांचे लक्ष्य गाठताना झगडावे लागले. हे लक्ष्य साधताना त्यांनी सहा गडी गमावले. त्यापैकी पहिले पाच गडी त्यांनी ७७ धावांमध्ये गमावले होते. मिलिंदकुमार (२३) व सुमित नरवाल  (नाबाद १९) यांनी आत्मविश्वासाने फलंदाजी करीत संघाचा विजय सुकर केला. हिमाचलकडून विक्रमजित मलिक याने २२ धावांमध्ये तीन बळी घेतले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा