Denmark Open 2023, PV Sindhu: दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधूने गुरुवारी येथे पहिला गेम गमावल्यानंतर शानदार पुनरागमन केले. जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावर असलेल्या इंडोनेशियाच्या ग्रेगोरिया मारिस्का तुनजुंगचा पराभव करून डेन्मार्क ओपन सुपरमध्ये प्रवेश केला. महिला एकेरी बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत सिंधूने प्रवेश केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सिंधूने शानदार पुनरागमन करत विजय मिळवला

दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधूने गुरुवारी पहिला गेम गमावल्यानंतर शानदार पुनरागमन करत जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावर असलेल्या इंडोनेशियाच्या ग्रेगोरिया मारिस्का तुनजुंगचा पराभव केला आणि ‘डेन्मार्क ओपन सुपर ७५०’ बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. मागील आठवड्यात आर्क्टिक ओपनच्या उपांत्य फेरीत पोहोचलेल्या माजी विश्वविजेत्या सिंधूने आपला उत्साह दाखवत ७१ मिनिटे चाललेल्या दुसऱ्या सामन्यात तुनजुंगचा १८-२१, २१-१५, २१-१३ असा पराभव केला.

हेही वाचा: IND vs BAN: सुपरमॅन के.एल. राहुल! हवेत सूर मारत पडकला जबरदस्त झेल, काय आहे विकेटकीपिंग सुधारण्यामागील गुपित? जाणून घ्या

सिंधूने कठीण परिस्थितीतून विजय खेचून आणला

या वर्षी या दोन खेळाडूंमध्ये झालेल्या तीन सामन्यांपैकी इंडोनेशियाच्या खेळाडूने दोन सामने जिंकले, ज्यामध्ये माद्रिद स्पेन मास्टर्स अंतिम फेरीचाही समावेश आहे. मात्र, या सामन्यापूर्वी सिंधू आणि तुनजुंग यांच्यामधील जर विजयाची आकडेवारी पाहिल्यास ८-२ अशी आहे. सिंधूचा यंदाचा मोसम चांगला गेला नाही आणि इंडोनेशियाविरुद्धच्या पहिल्या गेममध्ये ती ६-१२ अशी पिछाडीवर होती. सामन्यात ती कठीण स्थितीत दिसत होती. तिने पुनरागमन करण्याचा चांगला प्रयत्न केला पण तुनजुंगला पहिला गेम जिंकण्यापासून तिला रोखता आले नाही. मात्र तिने दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीत शानदार खेळ दाखवत विजय खेचून आणला.

हेही वाचा: IND vs BAN: दुखापतग्रस्त हार्दिक पांड्या फलंदाजीला येणार का? स्कॅनसाठी नेले होते हॉस्पिटलमध्ये, जाणून घ्या ICCचा नियम

सिंधूने दुसऱ्या गेममध्ये चांगला खेळ दाखवला

सिंधूने दुसऱ्या गेममध्ये चांगली कामगिरी केली आणि एका क्षणी ती १३-४ अशी आघाडीवर होती. त्यानंतर तुनजुंगने सलग आठ गुण घेत गुणसंख्या १४-१४ अशी बरोबरी केली. त्यानंतर भारतीय खेळाडू सिंधूने जोरदार पुनरागमन करत सहा गेम पॉइंट मिळवले आणि नंतर लवकरच गेम जिंकला.

निर्णायक गेममध्ये, दोन्ही खेळाडूंनी सुरुवातीला एकमेकांना कडवी झुंज दिली, परंतु सिंधूने दबावाखाली काही चुका केल्या ज्यामुळे तुनजुंगने ९-५ अशी आघाडी घेतली. सिंधूने पुन्हा चांगला खेळ करत गुणसंख्या १३-१३ अशी बरोबरीत आणली. यानंतर इंडोनेशियाच्या खेळाडूला चुका करण्यास भाग पाडले, ज्याचा फायदा घेत सिंधूने सात मॅच पॉइंट मिळवले आणि त्यानंतर दिमाखदाररित्या सामना जिंकला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Denmark open sindhu enters the quarterfinals of denmark open with a spectacular win know the full news avw
Show comments