Deputy PM Richard Marles was spotted playing gully cricket in Delhi: ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ सहाव्यांदा विश्वविजेता ठरला आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारता ६ गडी राखून पराभव केला. हा सामना पाहण्यसाठी ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान आणि संरक्षण मंत्री रिचर्ड मार्ल्स उपस्थित होते. यानंतर रिचर्ड मार्ल्स हे सोमवारी दिल्लीच्या रस्त्यावर मुलांसोबत क्रिकेट खेळताना दिसले. यावेळी रिचर्ड मार्ल्स गोलंदाजी करताना दिसले. आता त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये रिचर्ड मार्ल्स यांनी १४ ते १८ वयोगटातील मुलांशी संवाद साधला. त्याचबरोबर रिचर्ड मार्ल्स यांनी अरुण जेटली स्टेडियमवर दिवंगत अरुण जेटली यांना श्रद्धांजली वाहिली. एएनआय या वृत्तसंस्थेने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये मार्ल्स स्टेडियम कॉम्प्लेक्समध्ये उपपंतप्रधान गोलंदाजी आणि फलंदाजी करताना दिसत आहेत.

मुलांसोबत क्रिकेटचा आनंद लुटल्यानंतर मार्ल्स यांनी स्ट्रीट फूडच्या दुकानातून काही खरेदी केली आणि यादरम्यान त्यांनी डिजिटल पेमेंटही केले. तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाचे संरक्षण मंत्री मार्ल्स आणि परराष्ट्र मंत्री पेनी वोंग सकाळीच राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पोहोचले. दोघांनी येथे शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली.

ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान रिचर्ड मार्ल्स सध्या भारत दौऱ्यावर आहेत. रविवारी वर्ल्ड कप २०२३ च्या फायनल दरम्यान, त्यांनी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर सामना पाहण्याचा आनंद घेताना दिसला. ऑस्ट्रेलियन संघाने विजेतेपदाच्या लढतीत भारताचा सहा गडी राखून पराभव करून सहाव्यांदा विश्वचषक जिंकला.

हेही वाचा – पॅट कमिन्स विश्वचषक ट्रॉफीसह पोहोचला साबरमती नदीच्या काठावर, आलिशान क्रूझवर काढले फोटो, पाहा VIDEO

अंतिम सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारताने दिलेले २४१ धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियन संघाने चार गडी गमावून पूर्ण केले. ट्रॅव्हिस हेडने ऑस्ट्रेलियासाठी १३७ धावांची मॅचविनिंग इनिंग खेळली, ज्याच्या जोरावर कांगारूंनी सहाव्यांदा वर्ल्ड कप जिंकला. त्याचबरोर मार्नस लाबुशेनने नाबाद ५८ धावा केल्या.

हेही वाचा – आयसीसीकडून सर्वोत्कृष्ट प्लेइंग इलेव्हन जाहीर, चॅम्पियन कर्णधाराला मिळाले नाही स्थान; भारताच्या ६ खेळाडूंचा समावेश

यापूर्वी २००३ च्या विश्वचषकाच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला होता. आता पुन्हा कांगारूंनी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पराभूत केले. ऑस्ट्रेलियन संघाने २०१५ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतही टीम इंडियाचा पराभव केला होता. ऑस्ट्रेलियाने यापूर्वी १९८७, १९९९, २००३, २००७ आणि २०१५ मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deputy pm richard marles was spotted playing gully cricket at arun jaitley stadium after aus became world champions vbm
Show comments