India vs Pakistan World Cup 2023: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत १५ ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन्ही संघांमध्ये हा महामुकाबला होणार आहे. स्टेडियमची क्षमता १ लाखांपेक्षा जास्त आहे. त्यामुळेच या सामन्याला चाहते मोठ्या संख्येने पोहोचण्याची शक्यता आहे. वेळापत्रक जाहीर होताच अहमदाबादची हॉटेल्स जवळपास बुक झाली आहेत आणि त्यांच्या किमतीही खूप वाढल्या आहेत. आता चाहत्यांनी देसी जुगाड बनवला आहे. हा सामना पाहण्यासाठी त्याने हॉटेलऐवजी हॉस्पिटलचे बुकिंग सुरू केले आहे.

विश्वचषक स्पर्धेचे सामने ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर या कालावधीत होणार आहेत. ४६ दिवस चालणाऱ्या आयसीसी स्पर्धेत १० संघ सहभागी होत असून एकूण ४८ सामने खेळवले जाणार आहेत. अहमदाबाद मिररच्या बातमीनुसार, अहमदाबादमध्ये हॉटेलचे एका दिवसाचे भाडे जवळपास ५० हजारांवर पोहोचले आहे. त्याच वेळी, रुग्णालयात एक-दोन दिवस मुक्कामासाठी त्यांना ३ हजार ते २५ हजार इतकाच खर्च करावा लागणार आहे, जे हॉटेलच्या भाड्यापेक्षा सुमारे २५ हजार रुपयांनी कमी आहे.

Champions Trophy 2025 Updates ECB Came in Support of PCB
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ‘या’ देशाचा पाकिस्तानला पाठिंबा, BCCI शी पंगा घेणं पडू शकतं महागात
Amit Shah and Vinod Tawde meeting
Vinod Tawde Meeting with Amit Shah: “मराठा मुख्यमंत्री…
Harbhajan Singh believes India has a 50-50 chance of retaining the Border-Gavaskar Trophy in Australia
Harbhajan Singh : ‘जर सुरुवात चांगली झाली नाही तर…’, हरभजन सिंगचे पर्थ कसोटीपूर्वी मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘पहिलाच सामना खूप…’
Shubman Gill ruled out of first Test match in Perth because of fractured thumb IND vs AUS Border Gavaskar Trophy
IND vs AUS: शुबमन गिल ऑस्ट्रेलियाविरूद्ध पहिल्या कसोटीतून बाहेर, टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या, ‘हा’ खेळाडू करणार पदार्पण?
IPL 2025 Mega Auction Jofra and Archer Cameron Green not shortlisted
IPL 2025 : जोफ्रा आर्चर-बेन स्टोक्ससह ‘या’ पाच दिग्गज खेळाडूंवर महालिलावात लागणार नाही बोली, जाणून घ्या कारण
Eknath Shinde, Vijay Shivtare, Purandar Haveli,
पुरंदर विमानतळ ‘असा’ उभारणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा ! विजय शिवतारे यांच्या प्रचारार्थ घेतली सभा
India Refuses Cricket In Pakistan
पाकिस्तानात चँपियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारताचा नकार का? पाकव्याप्त काश्मीरचा मुद्दा का चर्चेत?

अहमदाबाद येथील बोपल क्षेत्रातील सानिध्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. पसार शाह यांनी सांगितले की, “रुग्णालयात ते संपूर्ण शरीर तपासणी आणि रात्रीचा मुक्काम करण्यास सांगत आहेत, जेणेकरून त्यांची दोन्ही कामे पूर्ण होतील. राहण्यासोबतच त्यांच्या शरीराची तपासणीही होईल आणि पैशांचीही बचत होईल. यामुळे त्यांचे आरोग्याची देखील खबरदारी घेतली जाईल आणि योग्य ती सुरक्षा दिली जाईल.”

हेही वाचा: Virat Kohli: ३४ वर्षीय विराट कोहलीने दाखवली चित्याची चपळाई, डायव्हिंगनंतर म्हणाला, “२०१२ पासून मी…” पाहा Video

इतर शहरांमध्येही अशीच परिस्थिती आहे

दुसरीकडे, दुसऱ्या हॉस्पिटलमधील डॉक्टर निखिल लाल यांनी सांगितले की, “१५ ऑक्टोबरच्या सुमारास आमच्या हॉस्पिटलमध्ये २४ ते ४८ तास मुक्कम करण्यासाठी बरीच चौकशी केली जात आहे. कारण आमच्याकडे संपूर्ण बॉडी चेकअपचे पॅकेज आहे. तसेच, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आगामी सामना होणार असल्याने त्यासाठी चाहते इथे चौकशी करत आहेत. इतर शहरांमध्येही हीच परिस्थिती आहे.” विश्वचषकापूर्वी आशिया चषकातही भारत आणि पाकिस्तान यांच्यात तीन सामने होण्याची शक्यता आहे. वन डे फॉरमॅटचे हे सामने श्रीलंकेत खेळवले जातील.

एकदिवसीय विश्वचषकातील भारताचा रेकॉर्ड उत्कृष्ट आहे

एकदिवसीय विश्वचषकाच्या विक्रमाबद्दल जर बोलायचे झाले तर, टीम इंडियाचा पाकिस्तानविरुद्धचा रेकॉर्ड शानदार आहे. या दोन्ही संघामध्ये आतापर्यंत ७ सामने खेळले गेले असून सर्व सामने जिंकण्यात टीम इंडियाला यश आले आहे. वर्ल्ड कपमध्ये जून २०१९ साली मँचेस्टर येथे दोन्ही संघांचा शेवटचा एकदिवसीय सामना झाला होता. या सामन्यात भारतीय संघाने डकवर्थ लुईस नियमानुसार ८९ धावांनी मोठा विजय मिळवला होता.

हेही वाचा: IND vs PAK: “…तर आम्ही टीम इंडियाला कुठेही हरवू शकतो”, माजी पाकिस्तानी खेळाडूने भारताला दिले आव्हान

प्रथम खेळताना रोहित शर्माच्या १४० धावांच्या जोरावर टीम इंडियाने ५ गड्यांच्या मोबदल्यात ३३६ धावांची मोठी धावसंख्या उभारली. रोहितने ११३ चेंडूंचा सामना केला होता. १४ चौकार आणि ३ षटकार मारले होते. विराट कोहलीने ७७ तर के.एल. राहुलने ५७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ ४० षटकांत ६ गडी गमावून २१२ धावाच करू शकला. पावसामुळे त्यांना ४० षटकांत ३०० धावांचे लक्ष्य मिळाले होते.