२०१९ चं वर्ष गाजवून विराट कोहलीची टीम इंडिया नवीन वर्षात नवीन आव्हानासाठी सज्ज झालेली आहे. नवीन वर्षात भारतीय संघाला पहिल्यांदा घरच्या मैदानावर श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांचा सामना करायचा आहे. यानंतर भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना होईल. यंदा वर्षाअखेरीस ऑस्ट्रेलियात टी-२० विश्वचषकाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. २०१९ विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला.
साखळी फेरीत धडाकेबाज खेळी करणारे भारतीय फलंदाज उपांत्य फेरीत सपशेल अपयशी ठरले. आगामी टी-२० विश्वचषकाचा विचार केला असता, भारतीय संघासमोर अनेक आव्हानं आहेत. मात्र, संघातल्या सर्वात मोठ्या समस्येवर अजुनही उपाय शोधता आलेला नाहीये. यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतची खराब कामगिरी हा गेल्या काही सामन्यांमधला चर्चेचा विषय ठरलाय. वारंवार संधी देऊनही ऋषभच्या कामगिरी सुधारणा होत नाहीये. मध्यंतरीच्या काळात संजू सॅमसन या फॉर्मात असलेल्या फलंदाजाला भारतीय संघात स्थान मिळालेलं असतानाही अंतिम संघात स्थान नाकारण्यात आलं. टी-२० विश्वचषकाआधी भारतीय संघाला सरावासाठी फार कमी सामने मिळणार आहेत. त्यादरम्यान ऋषभ पंतकडून नेमक्या काय अपेक्षा आहेत…आणि जर त्याने अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत तर पंतचं करायचं तरी काय या प्रश्नांचा घेतलेला आढावा….हा व्हिडीओ जरुर पाहा