Vijay Hazare Trophy Devdutt Padikkal Century : विजय हजारे करंडक स्पर्धेत कर्नाटककडून खेळणारा भारताचा युवा फलंदाज देवदत्त पडिक्कल याने शानदार शतक झळकावले. या शतकी खेळीच्या जोरावर त्याने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आपली दावेदारी भक्कम केली आहे. त्याने बडोद्याविरुद्धच्या सामन्यात १०३.३ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना ९६ चेंडूत शतक झळकावले. ज्यामुळे कर्नाटक संघाला ८ बाद २८१ धावांपर्यंत मजल मारता आली.

वास्तविक, मोतीबाग स्टेडियमवर कर्नाटक आणि बडोदा यांच्यात विजय हजारे करंडकाचा उपांत्यपूर्व सामना खेळला गेला. या सामन्यात कर्नाटककडून सलामी देणाऱ्या देवदत्त पडिक्कलने शानदार फलंदाजी करत दमदार शतक झळकावले. त्याने ९९ चेंडूचा सामना करताना १५ चौकार आणि २ गगनचुंबी षटकार मारत १०२ धावांची खेळी साकारली. या २४ वर्षीय डावखुऱ्या फलंदाजाचे लिस्ट ए मधील हे नववे शतक आहे. त्याने आतापर्यंत ३० डावांमध्ये त्याने ८२.३७ च्या सरासरीने १९७७ धावा केल्या आहेत.

देवदत्त पडिक्कलेच नववे लिस्ट ए शतक –

ज्यामध्ये ११ अर्धशतके आणि नऊ शतकांचा समावेश आहे. पडिक्कलचे बडोद्याविरुद्धचे हे शतक विजय हजारे टूर्नामेंटमधील दुसरे शतक आहे. यापूर्वी त्याने डिसेंबर २०२३ मध्ये चंदीगडविरुद्ध शतक झळकावले होते.या खेळीच्या जोरावर त्याला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी जाहीर होणाऱ्या भारतीय संघात संधी मिळण्याची शक्यता आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी पुढील महिन्यात म्हणजेच १९ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे, ज्यासाठी बीसीसीआय लवकरच संघाची घोषणा करू शकते.

हेही वाचा – NZ vs SL : तिसऱ्या वनडेत श्रीलंकेने उडवला न्यूझीलंडचा धुव्वा, मार्क चॅपमनची खेळी ठरली व्यर्थ

विजय हजारे करंडकमध्ये पडिक्कलचा एकूण रेकॉर्ड उत्कृष्ट राहिला आहे. त्याने कर्नाटकसाठी २६ डावात ९४.४७ च्या स्ट्राईक रेटने १९१५ धावा केल्या आहेत. या सामन्याबद्दल बोलायचे तर कर्नाटकने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात ८ गडी गमावून २८१ धावा केल्या. यादरम्यान पडिक्कल व्यतिरिक्त केव्ही अवनीशने अर्धशतकी खेळी खेळली. त्याने ६४ चेंडूंचा सामना करत ५२ धावा केल्या. त्याचवेळी बडोद्यातर्फे राज लिंबानी आणि अतित सेठ यांनी प्रत्येकी तीन तर लुकमान मेरिवाला आणि कृणाल पंड्याने प्रत्येकी एक विकेट घेतली.

Story img Loader