राडेक स्टेपनेकने निकोलस अल्माग्रोवर ३-२ ने मिळवलेल्या विजयासह झेक प्रजासत्ताकने प्रतिष्ठेच्या डेव्हिस चषकावर नाव कोरले. स्वतंत्र देश म्हणून मान्यता मिळाल्यानंतर झेक प्रजासत्ताकसाठी हा पहिलाच डेव्हिस चषक विजय आहे.
स्टेपनेकने ११व्या मानांकित अल्माग्रोला ६-४, ७-६ (०), ३-६, ६-३ असे नमवले. नेटजवळून सुरेख खेळ करत स्टेपनेकने हा विजय साकारला.
या विजयासह झेक प्रजासत्ताकने दुर्मिळ विजयाला गवसणी घातली. झेकच्या महिलांनी काही दिवसांपूर्वीच फेड चषक जिंकला होता.     

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा