Dhanashree Verma Viral Post: दुबईत काल पार पडलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफिच्या अंतिम सामन्यावेळी भारताचा फिरकीपटू युझवेंद्र चहल आरजे महवशसोबत दिसला होता. त्यानंतर याचे फोटोही व्हायरल झाले आहेत. यानंतर चहल आणि महवश ऐकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू झाल्या आहेत. अशात चहलची माजी पत्नी धनश्री वर्माने सोमवारी, इंस्टाग्राम स्टोरीजवर एक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये, “महिलांना दोष देणे आता फॅशन झाली आहे”, असे म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकीकडे युझवेंद्र चहल आणि आरजे महवश यांचे दुबई आंतरराष्ट्री स्टेडियमवरील फोटो आणि व्हिडिओ चर्चेत आहेत. तर दुसरीकडे, धनश्री वर्माची ही पोस्टही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

गेल्या महिन्यात घटस्फोट

यापूर्वी धनश्री आणि युजवेंद्र यांनी इंस्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केल्यानंतर त्यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर २१ फेब्रुवारी रोजी युझवेंद्र चहल आणि कोरिओग्राफर युट्यूबर धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब झाले होते. गेले अनेक महिने त्यांच्यात बेबनाव असल्याच्या चर्चा होत्या. सोशल मीडियावर दोघांनी एकमेकांना अनफॉलो केल्याच्या बातम्याही पसरल्या होत्या. त्यांच्या घटस्फोटानंतर या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला होता.

वांद्रे इथल्या फॅमिली कोर्टात २१ फेब्रुवारी रोजी या दोघांनी घटस्फोटाशी संबंधित औपचारिकता पूर्ण केली. विभक्त होण्यासंदर्भात विचारले असता या दोघांनी एकमेकांशी जुळवून घेता येणे कठीण झाल्याने हा निर्णय घेतल्याचे सांगितले होते. परस्पर सामंजस्याने दोघांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला होता.

२०२० मध्ये युझवेंद्र-धनश्रीचा विवाह

चहल आणि धनश्री यांचे डिसेंबर २०२० मध्ये गुरुग्राम इथे लग्न झाले होते. कोरोना काळात धनश्रीचे नृत्याचे व्हीडिओ चहलने पाहिले होते. यातूनच त्यांच्यात संवाद सुरू झाला होता. त्यानंतर या संवादाचे प्रेमात रुपांतर झाले आणि त्यानंतर त्यांनी विवाह केला होता.

भारत तिसऱ्यांदा चॅम्पियन

काल झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफिच्या अंतिम सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने न्यूझीलंडला पराभूत करत तिसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकली. यासह ही स्पर्धा तीन वेळा जिंकणारा भारत हा जगातील पहिला संघ ठरला आहे. या सामन्यात न्यूझींडने प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर विजयासाठी २५२ धावांचे आव्हान दिले होते. भारताने कर्णधार रोहित शर्माच्या ७६ धावांच्या जोरावर ४ फलंदाज राखून या सामन्यात विजय मिळवला.