भारतीय क्रिकेटपटू युझवेंद्र चहल आणि त्याची पत्नी कोरिओग्राफर धनश्री वर्मा यांच्यात बिनसले असून ते एकमेकांना घटस्फोट देणार असल्याची चर्चा रंगली होती. या चर्चेनंतर दोघांच्याही चाहत्यांना धक्का बसला होता. मात्र घटस्फोटाचे वृत्त चुकीचे असून त्या सर्व अफवा आहेत, असे स्पष्टीकरण धनश्री वर्माने दिले होते. दरम्यान, या चर्चेवर पडदा पडल्यानंतर धनश्री वर्माबाबत नवी माहिती समोर आली आहे. तिच्यावर नुकतीच शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. शस्त्रक्रियेनंतरचे फोटो खुद्द धनश्रीनेच सोशल मीडियावर शेअर केले असून ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचे तिने सांगितले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >> विश्लेषण : भारत-पाक सामना होणाऱ्या शारजाह स्टेडियमचा इतिहास काय, पाकिस्तानमधून आणली होती माती, जाणून घ्या सविस्तर

काही दिवसांपूर्वी धनश्री वर्माच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. याच कारणामुळे मागील काही दिवसांपासून ती सोशल मीडियावर दिसेनाशी झाली होती. मात्र आता तिच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. शस्त्रक्रियेनंतर पुन्हा जोमाने पुनरागमन करणार असल्याचे धनश्रीने सांगितले आहे. “माझ्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. आयुष्यातील प्रत्येक धक्का हा आगामी काळात पूर्ण क्षमतेने पुनरागमन करण्याची नामी संधी असते. आता मी पूर्वीपेक्षा जास्त उर्जा घेऊन परतेन. मी बरी व्हावी म्हणून तुम्ही प्रार्थना केली. मला शुभेच्छा दिल्या. तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार,” असे धनश्रीने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले आहे.

हेही वाचा >> Asia Cup 2022 : भारत-पाक महामुकाबल्याआधी पाकिस्तानी खेळाडूचं महत्त्वाचं विधान, म्हणतो ‘कोणत्याही संघाला…’

दरम्यान, धनश्रीचा पती युझवेंद्र चहल हा यूएईमध्ये सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करतोय. धनश्रीवरील शस्त्रक्रियेवेळी तो तिच्याजवळ नव्हता. त्याने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून धनश्रीला शुभेच्छा दिल्या आहेत. बायको लवकर बरी हो, असे युझवेंद्र चहल म्हणाला आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dhanashree verma undergo knee surgery shares pick bless yuzvendra chahal prd