Dharamshala Cricket Stadium Completion of renovation work : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ या स्पर्धेला ५ ऑक्टोबरपासून सुरूवात होणार आहे. अहमदाबादमध्ये इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला सामना होणार आहे. विश्वचषकाचे ४९ सामने भारतातील १० शहरांमध्ये खेळवले जाणार आहेत. या यादीत धर्मशाळेचेही नाव आहे. हिमाचल प्रदेशातील धर्मशाळा येथे बनवलेले क्रिकेट स्टेडियम जगातील सर्वात सुंदर स्टेडियमपैकी एक आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने विश्वचषकापूर्वी नव्याने तयारी केली आहे. स्टेडियमचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

२०२३ च्या विश्वचषकापूर्वी बीसीसीआयने अनेक स्टेडियमचे नूतनीकरण केले आहे. बोर्डाने प्रत्येक स्टेडियमसाठी भरघोस बजेट दिले होते. या यादीत हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमचाही समावेश करण्यात आला आहे. धर्मशाळा येथील हे स्टेडियम तयार आहे. येथे नवीन गवताची लागवड करण्यात आली आहे. आऊटफिल्ड पूर्वीपेक्षा खूपच चांगले झाले आहे. ड्रेसिंग रूम आणि प्रेक्षकांसाठी व्यवस्था वाढवण्यात आली आहे. ड्रेसिंग रुममध्ये काही बदल करण्यात आले आहेत.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

विश्वचषक २०२३ चे पाच सामने धरमशाला येथे खेळवले जाणार आहेत. येथील पहिला सामना बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांच्यात ७ ऑक्टोबर रोजी होणार आहे. यानंतर १० ऑक्टोबरला इंग्लंड आणि बांगलादेश यांच्यात सामना होणार आहे. १७ ऑक्टोबर रोजी दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्स यांच्यात सामना होणार आहे. टीम इंडियाही एक सामना खेळणार आहे. २२ ऑक्टोबरला भारताचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. हा सामना धर्मशाला येथेच होणार आहे. यानंतर २८ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात सामना होणार आहे.

हेही वाचा – IND vs WI ODI Series: विराटबद्दल विचारलेल्या प्रश्नावर रोहित शर्मा संतापला; म्हणाला, ”मी याआधीही अनेकदा म्हटलंय…”

या शहरात होणार विश्वचषक स्पर्धेचे सामने –

आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या सामन्यासाठी अहमदाबाद, चेन्नई, बंगळुरू, दिल्ली, धर्मशाळा, हैदराबाद, कोलकाता, लखनऊ, मुंबई आणि पुणे शहरांचा समावेश आहे. त्याचबरोबक हैदराबादसह गुवाहाटी आणि तिरुवनंतपुरममध्ये सराव सामने खेळवले जातील. १३ ऑक्टोबरला नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत-पाकिस्तानचा विश्वचषकातील शानदार सामना पाहायला मिळणार आहे.

Story img Loader