इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी जाहीर करण्यात आलेल्या भारतीय संघात मुंबईचा वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णीने स्थान मिळवले आहे. परंतु चेतेश्वर पुजारा आणि गौतम गंभीर यांना मात्र संघातून वगळण्यात आले आहे. मंगळवारी सायंकाळी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या मुख्यालयात झालेल्या राष्ट्रीय निवड समितीच्या बैठकीनंतर हा संघ जाहीर करण्यात आला. भारतीय संघ २५ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर या कालावधीत इंग्लंडशी पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका आणि एक ट्वेन्टी-२० सामना खेळणार आहे.
भारतीय संघ : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), विराट कोहली (उपकर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, सुरेश रैना, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, स्टुअर्ट बिन्नी, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, मोहित शर्मा, अंबाती रायुडू, उमेश यादव, धवल कुलकर्णी, संजू सॅमसन, करण शर्मा.

Story img Loader