भारतीय संघाच्या वेस्ट इंडिज विरुद्द मालिकेत बदलांची मालिका सुरुच आहे. सर्वात प्रथम पहिल्या टी-२० सामन्याचं ठिकाण बदलण्यात आल्यानंतर आयसीसीने तिसऱ्या पंचांकडे नो-बॉलचा निर्णय देण्याची जबाबदारी सोपवली. आता मालिकेला सुरुवात होण्याआधीच भारतीय संघात महत्वाचा बदल करण्यात आला आहे. सलामीवीर शिखर धवन दुखापतग्रस्त झाल्यामुळे विंडीजविरुद्धच्या मालिकेला मुकणार आहे. शिखर धवनच्या जागी संजू सॅमसनची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
शिखर धवनच्या गुडघ्याला दुखापत

 

बांगलादेशविरुद्ध मालिकेत संजू सॅमसनला भारतीय संघात स्थान मिळालं होतं. मात्र त्याला अंतिम संघात खेळण्याची संधी मिळाली नाही. यानंतर विंडीजविरुद्ध मालिकेत निवड समितीने संजूला डावलल्यामुळे चाहत्यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. मात्र शिखर धवनला झालेल्या दुखापतीमुळे संजूला आता भारतीय संघात स्थान मिळालेलं आहे. सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत खेळत असताना शिखर धवनच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाली आहे.

टी-२० मालिकेसाठी असा असेल भारताचा संघ –

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, संजू सॅमसन, लोकेश राहुल, ऋषभ पंत, मनिष पांडे, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, रविंद्र जाडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, दिपक चहर, भुवनेश्वर कुमार</p>

वन-डे मालिकेसाठी असा असेल भारताचा संघ –

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, संजू सॅमसन, लोकेश राहुल, ऋषभ पंत, मनिष पांडे, श्रेयस अय्यर, केदार जाधव, रविंद्र जाडेजा, शिवम दुबे, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, दिपक चहर, भुवनेश्वर कुमार

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dhawan ruled out of west indies t20is samson set to replace him psd