Rishabh Pant Funny video viral in IND vs AUS Perth Test : भारताचा स्टार यष्टीरक्षक ऋषभ पंत मैदानावर मौजमजा करण्यासोबतच त्याच्या खास शैलीत संघाचे मनोबल वाढवण्याचाही प्रयत्न करतो. त्याच्या कमेंट अनेकदा व्हायरल होतात. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पर्थ कसोटीच्या दुसऱ्या दिवशी पंतने असेच काही केले, ज्याने लोकांचे लक्ष वेधून घेतले. खरं तर, शनिवारी, जेव्हा ऑस्ट्रेलियाच्या शेपटाने टीम इंडियाला त्रास देण्यास सुरुवात केली, तेव्हा पंतने आपल्या सहकाऱ्यांना प्रोत्साहन दिले. भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक आणि समालोचक रवी शास्त्री यांनीही पंतच्या सुरात सूर मिसळला आणि पंतचे कौतुक केले.

ऋषभ पंतचा मजेशीर व्हिडीओ व्हायरल –

+

Eknath shinde and ajit pawar (1)
NDA च्या बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रतिनिधी गैरहजर; एकनाथ शिंदे म्हणाले, “स्वार्थ भावनेने…”
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Paaru
Video: “मी तुझ्याशिवाय आता श्वासही…”, आदित्यने पारूसमोर दिली प्रेमाची कबुली? प्रोमोवर प्रसाद जवादेच्या पत्नीच्या कमेंटने वेधले लक्ष
mohan bhagwat in disputed religious land
Mohan Bhagwat: मोहन भागवतांच्या भूमिकेशी ‘दी ऑर्गनायझर’ची फारकत; म्हणे, “वादग्रस्त धार्मिक स्थळांचं सत्य समोर आलंच पाहिजे!”
Check Mohammad Shami Sania Mirza marriage fact check photo
मोहम्मद शमी आणि सानिया मिर्झा अडकले विवाहबंधनात? व्हायरल फोटोंमुळे चर्चांना उधाण; पण सत्य काय? वाचा
Vanita Kharat
“कॉपी करताना…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात म्हणाली, “हिंमत तर एवढी…”
Virat Kohli Shouts At Mohammed Siraj who is Talking to Marnus Labuschagne Said Dont Talk To Them Laughingly Video
VIDEO: “यांच्याबरोबर हसत बोलू नकोस…”, लबूशेनबरोबर बोलताना पाहून विराट कोहली सिराजला ओरडला, मैदानात नेमकं काय घडलं?
Virat Kohli Will Face Banned or Fined Over Sam Konstas On Field Controversy ICC Rules E
IND vs AUS: विराट कोहलीवर एका सामन्याची बंदी की दंडात्मक कारवाई? कोन्स्टासबरोबरच्या धक्काबुक्कीचा काय होणार परिणाम, वाचा ICCचा नियम

+

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात एकेकाळी ७९ धावांवर ९ विकेट्स गमावल्या होत्या. त्यानंतर मिचेल स्टार्क आणि जोश हेझलवूड यांनी कांगारुचा डाव सावरला. यानंतर कर्णधार जसप्रीत बुमराहने वेगवान गोलंदाजांना सतत संधी दिली, पण स्टार्क आणि हेझलवूडमधील भागीदारी तोडण्यात यश आले नाही. अशा स्थितीत कर्णधाराने ४८ व्या षटकांत चेंडू फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदरकडे सोपवला. सुंदरने चेंडू घेतल्यानंतर पंतने आपल्या सहकारी खेळाडूंमध्ये उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी तो म्हणाला, भाई, गाफील राहून चालणार नाही. वैसु आपल्याला थोडं वातावरण तयार करावं लागेल. तुला थोडी मेहनत करावी लागेल.”

रवी शास्त्रींकडून ऋषभ पंतचे कौतुक –

यावेळी समालोचन करताना शास्त्री म्हणाले, “पंत अगदी बरोबर बोलत आहे. गाफील राहायचे नाही. भागीदारी तोडणे किती महत्त्वाचे आहे, हे पंतला माहीत आहे. तो खेळाडूंना अधिक प्रयत्न करण्यास सांगत आहे.” स्टार्क आणि हेजलवूडमधील भागीदारी वेगवान गोलंदाज हर्षित राणाने तोडली. दोघांनी दहाव्या विकेटसाठी २६ धावा जोडल्या. ऑस्ट्रेलियाकडून बाद होणारा स्टार्क हा शेवटचा खेळाडू होता. त्याने आपल्या संघासाठी सर्वाधिक धावा केल्या. हेझलवूडने नाबाद ७ धावा केल्या. भारताच्या १५० धावांच्या प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ५१.२. षटकांत १०४ धावांवरच आटोपला. ज्यामुळे भारताला ४६ धावांची आघाडी मिळाली.

हेही वाचा – Yashasvi Jaiswal : यशस्वी जैस्वालचा मोठा पराक्रम! गौतम गंभीरला मागे टाकत ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

भारताकडून बुमराह आणि नवोदित हर्षित राणाने अप्रतिम गोलंदाजी केली. बुमराहने १८ षटकात ३० धावा देत पाच विकेट्स घेतल्या. त्याने अकराव्यांदा एका डावात पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. हर्षितने १५.१ षटकात ४८ धावा दिल्या आणि तीन विकेट्स घेतल्या. मोहम्मद सिराजने दोन गडी बाद केले. ऑस्ट्रेलियाच्या सहा खेळाडूंना दुहेरी आकडा गाठता आला नाही. भारतीय संघाच्या दुसऱ्या डावाला सुरुवात झाली असून ३१ षटकांनंतर बिनबाद ८९ धावा केल्या आहेत. सध्या यशस्वी जैस्वाल ४४ आणि केएल राहुल ३६ धावांवर खेळत आहेत.

Story img Loader