भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने एकदिवसीय क्रमवारीत अव्वल पाच जणांमध्ये स्थान मिळवले आहे. पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या धोनीने फलंदाजांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर मजल मारली आहे. सुरेश रैना २६व्या तर युवराज सिंग ४१व्या स्थानावर पोहोचला आहे. पाकिस्तानचा सलामीवीर नासिर जमशेदने ४५ क्रमांकाच्या सुधारणेसह ३१वे स्थान पटकावले आहे. गोलंदाजांच्या यादीत अव्वल २० जणांच्या यादीत स्थान मिळवणारा रवीचंद्रन अश्विन हा एकमेव भारतीय गोलंदाज आहे. तो सातव्या स्थानी आहे. अलीकडेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मायकेल हसी याने ११वे स्थान मिळवले आहे.

Story img Loader