भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सध्या ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका सुरु आहे. त्याआधी झालेल्या टी२० मालिकेसाठी धोनीला संधी देण्यात आली नव्हती. त्यामुळे तो आपल्या कुटुंबियांसोबत वेळ घालवत आहे. या दरम्यान, धोनी सध्या त्याची पत्नी साक्षी धोनीच्या शूजमुळे चर्चेत आहे.
धोनीने कितीही विक्रम केले तरीही त्याचे पाय कायम जमिनीवर असतात. आपल्या वर्तणुकीतून तो सदैव आपल्या चाहत्याची मनं जिंकतो. तसेच काहीसे साक्षीच्या बाबतीत घडलेल्या घटनेमुळे पाहायला मिळाले आहे. धोनीने साक्षीला नवीन बुट विकत घेऊन दिले होते. ते बूट घालून पाहण्यासाठी साक्षीचे प्रयत्न सुरु होते. त्यावेळी धोनीने कशाचीही पर्वा न करता खाली बसून तिला बूट घालण्यासाठी मदत केली. सार्वजनिक ठिकाणी त्याने असे केल्यामुळे धोनीबाबत चाहत्यांच्या मनात असलेला आदर अजूनच वाढला.
साक्षीने धोनीचे कौतुक तर केलेच पण तिने त्यासाठी मेजशीर पर्याय निवडला. तिने तो फोटो इंस्टाग्रामवर टाकला आणि त्यावर एक मेजशीर संदेश लिहिला.
View this post on Instagram
You paid for the shoes so you tie them tooo !!! Photo Credit – @k.a.b.b.s
दरम्यान, या आधीही विश्रांतीचा वेळ त्याने मुलगी जिवा आणि पत्नी साक्षी यांच्यासोबत घालवल्याचे दिसून आले होते. इंग्लंडमधील निराशाजनक कामगिरीनंतर धोनीला टी२० संघातून वगळण्यात आले होते. तेव्हापासून त्याला टी२० मालिका खेळता आलेली नाही.