भारतीय संघाचा कॅप्टन कूल धोनीला आपला जवळचा मित्र संतोष लाल आजारी असल्याचे समजले आणि धोनीने संतोषशी ताबडतोब मोबाईलवरून संपर्क साधला. संतोष लाल रणजी खेळाडू आहे. धोनी संतोषच्या वैद्यकिय चाचण्यासाठी आर्थिकरित्या मदतही करत आहे. संतोष स्वादुपिंडाशी संबंधित आजाराशी झुंझ देत आहे.
धोनीचे माजी प्रशिक्षक चंचल भट्टाचार्या यांनी दिलेल्या माहितीनुसार महेंद्रसिंग धोनी आपला बालपणाचा मित्र संतोष आजारी असल्याने चिंतीत आहे. तसेच तो त्याची नेहमी विचारपूसही करतो आणि संतोष लवकरात लवकर बरा व्हावा यासाठीचे प्रयत्नही धोनी करत आहे. त्याचबरोबर संतोषचा आजार अधिक बळावल्याने त्याला आज तातडीने दिल्लीतील रुग्णालयात हलविण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले. धोनी बरोबरच संतोषचे इतर मित्रही मदत करत आहेत. दरम्यान, झारखंड क्रिकेट नियामक मंडळानेही संतोषच्या उपचारासाठी एक लाख रूपयांची मदत जाहीर केली आहे.
मुख्यम्हणजे धोनीने संतोष सोबत अनेक रणजी सामने खेळले आहेत आणि धोनीचा चर्चित ‘हेलिकॉप्टर फटका’ संतोष कडूनच शिकल्याचे धोनीने स्वत: अनेक वेळा मान्य केले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 16th Jul 2013 रोजी प्रकाशित
रणजी खेळाडू ‘संतोष लाल’साठी धोनी आला धावून
भारतीय संघाचा कॅप्टन कूल धोनीला आपला जवळचा मित्र संतोष लाल आजारी असल्याचे समजले आणि धोनीने संतोषशी मोबाईलवरून संपर्क साधला. संतोष लाल रणजी खेळाडू आहे. धोनी संतोषच्या वैद्यकिय चाचण्यासाठी आर्थिकरित्या मदतही करत आहे. संतोष स्वादुपिंडाशी संबंधित आजाराशी झुंझत आहे.

First published on: 16-07-2013 at 12:56 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dhoni came forward to help his friend santosh lal