भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्या मालकीच्या इंडिया सिमेंट्स कंपनीचा उपाध्यक्ष तसेच आता रिती स्पोर्ट्स या कंपनीमध्ये १५ टक्के भागीदारी असल्याचे उघड झाल्यामुळे भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याचा पाय आणखी खोलात रुतण्याची शक्यता आहे. रवींद्र जडेजा, सुरेश रैना, प्रग्यान ओझा आणि रुद्रप्रताप सिंग या खेळाडूंच्या व्यवस्थापनाचे काम रिती स्पोर्ट्स ही कंपनी पाहते. रिती स्पोर्ट्सचा मालक अरुण पांडे हा धोनीचा जीवलग मित्र आहे. भारतीय कर्णधार आणि कंपनीचा भागीदार म्हणून धोनीने परस्परविरोधी हितसंबंध जपले. तसेच कंपनीच्या फायद्यासाठी या खेळाडूंना भारतीय संघात स्थान देण्याच्या निर्णयांमध्ये धोनीचे हितसंबंध असल्याचा आरोप त्याच्यावर होत आहे.
धोनी या कंपनीशी जोडला गेलेला असल्यामुळे अनेक क्रिकेटपटू रिती स्पोर्ट्सला प्राधान्य देत आहेत. त्यामुळेच ही कंपनी सध्या फॉर्मात आहे. धोनीच्या या व्यावहारिक संबंधाचा फायदा या कंपनीशी संलग्न असलेल्या खेळाडूंना मिळत आहे, असा आरोप माजी क्रिकेटपटू मनींदर सिंग यांनी केला आहे.
धोनीचा पाय आणखी खोलात!
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्या मालकीच्या इंडिया सिमेंट्स कंपनीचा उपाध्यक्ष तसेच आता रिती स्पोर्ट्स या कंपनीमध्ये १५ टक्के भागीदारी असल्याचे उघड झाल्यामुळे भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याचा पाय आणखी खोलात रुतण्याची शक्यता आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 04-06-2013 at 03:39 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dhoni in more trouble