आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) जाहीर केलेल्या चॅम्पियन्स करंडकाच्या संघाचे कर्णधारपद महेंद्रसिंग धोनीला देण्यात आले आहे. धोनीबरोबरच या संघामध्ये स्पर्धेत सर्वोत्तम खेळाडू ठरलेल्या शिखर धवनसह एकूण पाच जणांचा समावेश करण्यात आला आहे, तर उपविजेते ठरलेल्या इंग्लंडच्या संघातील दोन खेळाडू या संघात आहेत. यंदाच्या स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा आयसीसीने या संघात समावेश केला आहे.
आयसीसीचा चॅम्पियन्स करंडक संघ : शिखर धवन (भारत), जोनाथन ट्रॉट (इंग्लंड), कुमार संगकारा (श्रीलंका), विराट कोहली (भारत), मिसबाह-उल-हक (पाकिस्तान), महेंद्रसिंग धोनी (भारत), रवींद्र जडेजा (भारत), रयान मॅकलारेन (दक्षिण आफ्रिका), भुवनेश्वर कुमार (भारत), जेम्स अँडरसन (इंग्लंड), मिचेल मॅक्लेनघान (न्यूझीलंड) आणि जो रूट (इंग्लंड).

Story img Loader