पाकिस्तानविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून विश्वविजयात मोलाचा वाटा उचललेल्या युवराज सिंगचे दमदार पुनरागमन झाले आहे. विश्वचषकाच्या अंतिम फेरीनंतर युवराज एकही एकदिवसीय सामना खेळलेला नाही. याचप्रमाणे निवड समितीने महेंद्रसिंग धोनीवर मात्र विश्वास कायम ठेवत त्याच्यावरच कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० अशा दोन्ही संघांत इशांत शर्माला स्थान देण्यात आले आहे. एकदिवसीय संघात शामी अहमद हा नवीन चेहरा संघात असेल, तर झहीर खानला संघात स्थान देण्यात आलेले नाही.
एकदिवसीय संघ : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार-यष्टीरक्षक), वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, विराट कोहली, युवराज सिंग, रोहित शर्मा, सुरेश रैना, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, इशांत शर्मा, अजिंक्य रहाणे, अशोक दिंडा, भुवनेश्वर कुमार, शामी अहमद आणि अमित मिश्रा.
ट्वेन्टी-२० संघ : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार- यष्टीरक्षक), गौतम गंभीर, विराट कोहली, युवराज सिंग, रोहित शर्मा, सुरेश रैना, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, इशांत शर्मा, अजिंक्य रहाणे, अशोक दिंडा, भुवनेश्वर कुमार, परविंदर अवाना, पीयूष चावला आणि अंबाती रायुडू.