फलंदाजांच्या सुमार कामगिरीवर भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी नाराज आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यासारखेच दुसऱया सामन्यातही फलंदाजांनी खराब कामगिरीकेल्यामुळे एकूणच आमची कामगिरी निराशाजनक झाल्याने एकदिवसीय मालिका हातून निसटली असल्याचेही धोनी म्हणाला. दक्षिण आफ्रिकेच्या २८१ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाच्या कोणत्याही फलंदाजाला अवघ्या ४० धावांच्यावर मजल मारता आली नाही आणि संघ अवघ्या १४६ धावांत गारद झाला. यावरही धोनीने खंत व्यक्त केली.
धोनी म्हणाला, गेल्या दोन सामन्यांच्या निकालांकडे पाहता संघाचे पहिले तीन फलंदाज लवकर बाद झाल्याने त्यानंतर मधल्या फळीतील फलंदाजांचीही कामगिरी निराशाजनक राहिल्याची मला खंत आहे. खेळपट्टीची पुरेपुर माहिती असतानाही आमच्या फलंदाजांना यश मिळत नाही हे पाहून मी आश्चर्यचकीत आहे. काही फटके वगळता ज्या प्रतिचे फटके आमच्या फलंदाजांकडून खेळले गेले त्यावर मी नाखूष आहे.”
मागील सामन्यापेक्षा या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी बजावली परंतु, त्या मानाने फलंदाजांच्या कामगिरीत कोणतीही प्रगती झालेली दिसली नाही. फिरकी गोलंदाजांनीही उत्तम भुमिका बजावली. डरबनच्या खेळपट्टीवर २८० धावसंख्या मर्यादशील होती. असेही धोनी म्हणाला. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा