MS Dhoni and Virat Kohli: भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे केवळ भारतातच नाही तर जगभरात चाहते आहेत. २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या धोनीची लोकप्रियता कमी झालेली नाही. तो आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार आहे आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्याने चेन्नईला दोनदा चॅम्पियन बनवले आहे. दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळणाऱ्या विराट कोहलीचेही अनेक चाहते आहेत. दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्सला या दोन्ही खेळाडूंना दक्षिण आफ्रिकेतील टी-२० लीगमध्ये खेळताना पाहायचे आहे.
गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेत टी-२० लीग सुरू झाली आहे. त्याचे नाव (SAT20) एसए टी-२० आहे. धोनी आणि कोहलीने कारकिर्दीच्या शेवटी प्रत्येकी एका हंगामासाठी या स्पर्धेत सहभागी व्हावे, अशी डिव्हिलियर्सची इच्छा आहे. डिव्हिलियर्सला एका मुलाखतीत विचारण्यात आले की, “त्याला SAT20 मध्ये भारतीय खेळाडूंना खेळताना बघायला आवडेल का?” यावर त्याने मजेशीर उत्तर दिले.
डिव्हिलियर्स काय म्हणाला?
डिव्हिलियर्स म्हणाला, “मला वाटते की विराटला येथे आणणे शक्य होईल. त्याच्या कारकिर्दीच्या शेवटी आपण त्याला मोठा निरोप देऊ शकतो. रॉबिन उथप्पा आणि आर.पी. सिंग वगळता मी कोणत्याही खेळाडूशी याबाबत चर्चा केलेली नाही. आम्ही खूप पूर्वी एकत्र काही काम केले होते आणि मी त्याला सांगितले की त्याला या लीगमध्ये पाहून खूप आनंद होईल.”
डिव्हिलियर्स पुढे म्हणाला की, “भारतीय खेळाडूंना SAT20 च्या दुसऱ्या सत्रात खेळताना पाहणे शक्य होणार नाही, परंतु तिसऱ्या किंवा त्यानंतरच्या हंगामात असे घडू शकते. डिव्हिलियर्सला SAT20च्या दुसऱ्या सत्रासाठी ब्रँड अॅम्बेसेडर बनवण्यात आले आहे. “आमच्या लीगमध्ये कोण खेळेल हे माहित नाही, परंतु जर धोनी आणि विराटसारखे खेळाडू येथे त्यांचे अंतिम हंगाम खेळले तर नक्कीच दक्षिण आफ्रिका क्रिकेटला फायदा होईल. तसेच, त्या दोन्ही खेळाडूंच्या कारकिर्दीला मोठा निरोप देता येईल,” असं डिव्हिलियर्स म्हणाला.
धोनी आणि कोहलीची आयपीएल कारकीर्द
एम.एस. धोनीने आयपीएलमध्ये २५० सामने खेळले आहेत. त्याने २१८ डावात ५०८२ धावा केल्या आहेत. धोनीची सरासरी ३८.७९ आणि स्ट्राइक रेट १३५.९२ आहे. पुढील सीझनमध्येही तो खेळताना दिसणार आहे. १९ डिसेंबरला होणाऱ्या लिलावापूर्वी चेन्नईने त्याला कायम ठेवले आहे. दुसरीकडे, कोहली आरसीबीकडून खेळणार आहे. त्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत २३७ सामने खेळले आहेत. कोहलीच्या नावावर २२९ डावांमध्ये ७२६३ धावा आहेत. विराटने ३७.२५च्या सरासरीने आणि १३०.०२च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत.