आयपीएलच्या १७व्या हंगामासाठी अनेक खेळाडू आपापल्या संघात सामील झाले आहेत. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत चमकदार कामगिरी करणारा ध्रुव जुरेलही आयपीएलसाठी सज्ज झाला आहे आणि तोही राजस्थान रॉयल्सच्या कॅम्पमध्ये पोहोचला. त्याच संघात जंगी स्वागत करण्यात आले. जुरेलचा हा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ध्रुव येताच राजस्थान रॉयल्सने सलाम करत त्याचे स्वागत केले.
– quiz
ध्रुव जुरेलचा हा व्हिडिओ राजस्थान रॉयल्सने त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरून शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये जुरेल त्याच्या कारमधून खाली उतरताना दिसत आहे. हॉटेलमध्ये प्रवेश केल्यानंतर त्याचं औक्षण करून स्वागत केले जात आहे आणि तो आतमध्ये यायला निघतो. यानंतर रॉयल्स संघाच्या चाहत्यांनीही त्याला सॅल्युट केला. जुरेलला सुरूवातीला राजस्थान रॉयल्सने २० लाख रुपयांना खरेदी केले होते. तेव्हापासून तो राजस्थान रॉयल्सचा भाग आहे. जुरेल आयपीएल २०२४ मध्ही ये राजस्थानकडून खेळताना दिसणार आहे.
अलीकडेच इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत पदार्पण करणाऱ्या ध्रुव जुरेलने ३ सामन्यांच्या ४ डावात १९० धावा केल्या. त्याची फलंदाजीची सरासरी ६३.३३ होती आणि त्याने एक अर्धशतकही झळकावले. रांची येथील धोनीच्या घरच्या मैदानावर खेळताना संघ कठीण परिस्थितीत त्याने शानदार अर्धशतक झळकावले आणि यानंतर ध्रुव जुरेलने मैदानात सॅल्युट करत पहिल्या अर्धशतकाचा आनंद साजरा केला.
सामन्यानंतर ध्रुव जुरेलने त्याच्या सेलिब्रेशनबद्दल माहिती दिली. भारतीय सैन्य दलातील माजी सैनिक असलेल्या वडिलांसाठी त्याने हे सेलिब्रेशन केले असल्याचे तो म्हणाला. खरं तर, या कसोटीपूर्वी त्याच्या वडिलांनी इच्छा व्यक्त केली होती की पुढच्या सामन्यात तू मैदानात सॅल्युट करताना दिसला पाहिजे. म्हणजेच साध्या शब्दात त्याच्या वडिलांना सांगायचे होते की तुला खूप धावा करायच्या आहेत. वडिलांची ही इच्छा ध्रुव जुरेलने त्याच्या पुढच्याच डावात पूर्ण केली. त्यानंतर ध्रुव जुरेलचे सॅल्युट सेलिब्रेशन व्हायरल झाले. त्याच्या या सेलिब्रेशनमुळेच आता जेव्हा तो राजस्थान रॉयल्सच्या कॅम्पमध्ये दाखल झाला तेव्हा याच पद्धतीने त्याचे स्वागत करण्यात आले.
ध्रुवची आयपीएलमधील कामगिरी
ध्रुव जुरेल हा यष्टिरक्षक फलंदाज आहे. तो मधल्या फळीत फलंदाजी करताना मोठे फटके मारण्याची ताकद त्याच्यात आहे. ध्रुव जुरेल, २०२० मधील १९ वर्षांखालील विश्वचषक खेळणाऱ्या भारतीय संघाचा उपकर्णधार होता. त्याला राजस्थान रॉयल्सने २० लाख रुपयांना विकत घेतले आहे. आतापर्यंत तो फक्त आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळला आहे. या संघासाठी आतापर्यंत खेळलेल्या १३ सामन्यांमध्ये ध्रुव जुरेलचा स्ट्राईक रेट १७२.७३ इतका आहे.