Neeraj Chopra on Diamond League: वर्ल्ड चॅम्पियन बनल्यानंतर अवघ्या चार दिवसांनी नीरज चोप्रासमोर या मोसमात आपली विजयी मालिका सुरू ठेवण्याचे आव्हान आहे. नीरज गुरुवारी डायमंड लीगमध्ये प्रवेश करणार आहे. या मोसमात आतापर्यंत त्याला एकदाही पराभवाचा सामना करावा लागला नाही. नीरज रविवारी बुडापेस्टमध्ये ८८.१७ मीटर भालाफेक करून प्रथमच विश्वविजेता ठरला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नीरज लीगमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे

या मोसमात नीरज फक्त तीन स्पर्धा खेळला आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिप व्यतिरिक्त, यामध्ये दोहा आणि लॉसनेच्या डायमंड लीग लेगचा समावेश आहे. या तिन्ही स्पर्धेमध्ये नीरजने बाजी मारली आहे. दोहामध्ये त्याने ८८.६७ मीटर भालाफेक केली होती, तर लॉसनेमध्ये त्याने ८७.६६ मीटर भालाफेक करत बाजी मारली होती. या मोसमात नीरजची ही चौथी स्पर्धा असेल. डायमंड लीग स्पर्धेतील भालाफेकमधील ही चौथी आणि अंतिम स्पर्धा आहे.

दोन स्पर्धांमध्ये १६ गुणांसह तो तिसऱ्या स्थानावर आहे. बुडापेस्टमध्ये ८६.६७ मीटरसह कांस्यपदक जिंकणारा झेक प्रजासत्ताकचा जॅकब वडलेजे तीन स्पर्धांमध्ये २१ गुणांसह पहिल्या स्थानावर आहे आणि जर्मनीचा ज्युलियन वेबर तीन स्पर्धांमध्ये १९ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

हेही वाचा: IND vs PAK: भारताविरुद्धच्या मॅचपूर्वी पाकिस्तानची चिंता वाढली, नेपाळविरुद्धच्या सामन्यात ‘हा’ स्टार गोलंदाज दुखापतग्रस्त

डायमंड लीगची फायनल १६ सप्टेंबरपासून होणार आहे

झुरिच लेग नंतर १६ आणि १७ सप्टेंबर रोजी यूजीन (यूएसए) मध्ये डायमंड लीग फायनल होईल. नीरजने गेल्या वर्षी झुरिचमध्ये डायमंड लेगची फायनल जिंकली होती. यावेळी त्याचा सामना वडलेचे, वेबर आणि माजी विश्वविजेता अँडरसन पीटर्स यांच्याशी आहे. बुडापेस्टमध्ये रौप्यपदक जिंकणारा पाकिस्तानचा अर्शद नदीम या स्पर्धेत खेळत नाहीये. लीगमध्ये पहिल्या सहा क्रमांकावर असलेले भालाफेकपटू युजीनमध्ये अंतिम सामना खेळतील.

श्रीशंकरही आपला दावा मांडणार आहेत

नीरज व्यतिरिक्त मुरली श्रीशंकरही लांब उडीत आपला दावा ठोकणार आहे. जागतिक चॅम्पियनशिपमध्ये ७.७४ मीटरसह त्याने चांगली कामगिरी केली नाही आणि तो २२व्या स्थानावर राहिला. मात्र, दोन डायमंड लीग स्पर्धांमध्ये तो १० गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. जागतिक आणि ऑलिम्पिक चॅम्पियन ग्रीसचा मिल्टिआडिस टँटोग्लू २१ गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. श्रीशंकरने या मोसमात ८.४१ मीटर उडी मारली आहे. अंतिम फेरी गाठण्यासाठी त्यांना अशीच कामगिरी करावी लागेल.

हेही वाचा: विजयी घोडदौड राखण्याचे भालाफेकपटू नीरजचे लक्ष्य! डायमंड लीगमधील झ्युरिक येथील टप्पा आज 

ऑलिम्पिक आणि जागतिक चॅम्पियनशिप सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा याने बुधवारी झुरिच येथे एक दावा केला आहे. भारत २०२७च्या जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यासाठी बोली लावेल, असे तो म्हणाला. डायमंड लीग संमेलनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत २०२७ मध्ये भारताच्या जागतिक चॅम्पियनशिपचे आयोजन करण्याच्या संधींबद्दल विचारले असता, नीरज म्हणाला, “भारत बोली लावणार आहे. मी चाहत्यांची विनंती करेन की त्यांनी मोठ्या संख्येने सामना पाहण्यासाठी हजेरी लावावी.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Diamond league neeraj will continue his winning streak will compete today so far chopra is invincible in this season avw