WPL 2023 1st Match MIW vs GGW: महिला प्रीमियर लीगच्या उद्घाटन हंगामातील पहिला सामना शनिवारी गुजरात जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला जात आहे. मात्र, हंगाम सुरू होण्यापूर्वीच एका वादाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. खरं तर, गुजरात जायंट्सचा भाग असलेल्या डिआंड्रा डॉटिनबद्दल बातमी आली होती की तिला स्पर्धेतून बाहेर काढण्यात आलं आहे. मात्र आता हकालपट्टीच्या कारणावर त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.
ईएसपीएनक्रिकइंफोच्या रिपोर्ट्सनुसार, डॉटिन वैद्यकीय स्थितीतून बरी होत आहे, परंतु तिच्या सोशल मीडिया पोस्ट्समुळे तिला स्पर्धेतून बाहेर का काढण्यात आले हा प्रश्न सर्वांना पडला आहे.
डिआंड्रा डॉटिनने तिच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर तिच्या दुखापतीबद्दल अपडेट दिले –
अनुभवी अष्टपैलू डिआंड्रा डॉटिनने आपल्या आरोग्याविषयी ट्विट केले आहे. तिने लिहिले की, ‘मला कशाचाही त्रास होत नाही आणि मी कशातूनही बरी हो नाही. मला संघातून जबरदस्तीने बाहेर काढण्यात आले आहे.’
ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू किम गर्थचा डिआंड्रा डॉटिनच्या जागी गुजरात जायंट्स संघात समावेश करण्यात आला आहे. गेल्या महिन्यात झालेल्या लिलावात ती अनसोल्ड राहिली होती. दक्षिण आफ्रिकेत झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने ही ट्रॉफी जिंकली होती. किम गर्थ या ऑस्ट्रेलिया संघाचा एक भाग होती.
हेही वाचा – WPL 2023 MI vs GG: कोण आहे १९ वर्षीय जिंतीमणी कलिता? जिच्यावर हरमनप्रीतने पहिल्याच सामन्यात दाखवला विश्वास
गुजरात जायंट्स संघाकडून खेळणारी किम गर्थ ही पाचवी ऑस्ट्रेलियन खेळाडू आहे. गुजरात संघाचे नेतृत्व ऑस्ट्रेलियाची अनुभवी सलामीवीर बेथ मुनी करत आहे. किमने वयाच्या १४ व्या वर्षी आयर्लंडसाठी पदार्पण केले, जे तिचे जन्मस्थान आहे. तिने २०१० मध्ये न्यूझीलंडविरुद्ध पदार्पण केले होते. त्यानंतर गेल्या वर्षी भारताविरुद्धच्या टी-२० सामन्यातून तिने ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
सामन्याबद्दल बोलायचे तर, मुंबई इंडियन्स संघाने प्रथम फलंदाजी करताना १६ षटकांनतर ३ बाद १५९ धावा केल्या आहेत. केर २५ आणि हरमनप्रीत कौर ६१ धावांवर खेळत आहेत. यस्तिका भाटिया एका धावेवर बाद झाली. तिला तनुजा कनवरने बाद केले.
गुजरात जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): बेथ मुनी (कर्णधार), सब्भिनेनी मेघना, हरलीन देओल, अॅशलेग गार्डनर, अॅनाबेल सदरलँड, दयालन हेमलता, जॉर्जिया वेरेहम, स्नेह राणा, तनुजा कंवर, मोनिका पटेल, मानसी जोशी
मुंबई इंडियन्स महिला (प्लेइंग इलेव्हन): हेली मॅथ्यूज, यास्तिका भाटिया (यष्टीरक्षख), हरमनप्रीत कौर (कर्णधार), नॅट सायव्हर-ब्रंट, अमेलिया केर, अमनजोत कौर, पूजा वस्त्राकर, हुमैरा काझी, इस्सी वोंग, जिंतीमणी कलिता, सायका इशाक