कर्करोगाच्या उपचारांनंतर युवराज सिंगला भेटायचे धैर्य माझ्याकडे नव्हते. कदाचित मला खूप रडू कोसळले असते आणि हा प्रसंग मी टाळत होतो. लंडन येथे आमची भेट झाल्यानंतर मी त्याला घट्ट आलिंगन दिले व माझ्या भावना त्याद्वारे प्रगट केल्या, असे सचिन तेंडुलकर याने सांगितले.
युवराजने लिहिलेल्या ‘दी टेस्ट ऑफ माय लाईफ’ या पुस्तकाचे प्रकाशन सचिनच्या हस्ते झाले. त्या वेळी आपल्या भावनांना वाट मोकळी करत सचिन म्हणाला, ‘‘मी जेव्हा लंडनमध्ये युवराजला भेटायला गेलो, तेव्हा त्याला भेटण्याचे धैर्य मला होत नव्हते, असे मी पत्नी अंजलीला सांगितले होते. तथापि युवीला घट्ट मिठी मारल्यानंतर तो पुन्हा पूर्ववत झाल्याची मला खात्री पटली व आम्ही भोजन केले. अंजली हिच्याशी युवराजच्या आजाराविषयी मी चर्चा केली तेव्हा युवराज हा कोणत्या स्थितीतून जात होता, याची मला जाणीव झाली. खरंच त्याने अतिशय धैर्याने आजारावर मात केली आहे.’’
या कार्यक्रमाला भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली हेसुद्धा उपस्थित होते. धोनी म्हणाला, ‘‘युवीच्या आजाराविषयी मला कळले, तेव्हा मला खोटेच वाटले. मात्र युवराजच्या आजाराची खात्रीलायक बातमी मला कळल्यानंतर मला आश्चर्याचा धक्का बसला होता.’’
युवराजने सांगितले, ‘‘विश्वचषक २०११ स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध मी फलंदाजीस उतरलो, तेव्हा धोनी मला फारसा बोलला नाही. मात्र सामना जिंकल्यानंतर त्याने मला खूप शाबासकी दिली. अशा प्रेरणादायक सहकाऱ्यांमुळेच मला आजाराशी लढण्याचे सामथ्र्य लाभले.’’
युवराजला भेटण्याचे धैर्य नव्हते – सचिन
कर्करोगाच्या उपचारांनंतर युवराज सिंगला भेटायचे धैर्य माझ्याकडे नव्हते. कदाचित मला खूप रडू कोसळले असते आणि हा प्रसंग मी टाळत होतो. लंडन येथे आमची भेट झाल्यानंतर मी त्याला घट्ट आलिंगन दिले व माझ्या भावना त्याद्वारे प्रगट केल्या, असे सचिन तेंडुलकर याने सांगितले.
First published on: 20-03-2013 at 03:40 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Did not want to break down in front of a sick yuvraj singh sachin tendulkar