Kane Williamson on World Cup 2023: केन विल्यमसनने शुक्रवारी कबूल केले की भारतात २०२३च्या आयसीसी विश्वचषक स्पर्धेत खेळण्याची त्याची शक्यता कमी आहे. न्यूझीलंडच्या या फलंदाजावर नुकतीच शस्त्रक्रिया झाली असून तो त्यातून सावरत आहे. विल्यमसनच्या गुडघ्याच्या आधीच्या क्रूसीएट लिगामेंटवर (ACL) या वर्षी एप्रिलमध्ये शस्त्रक्रिया झाली होती. अहमदाबादमध्ये चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्सकडून खेळताना आयपीएल २०२३च्या सुरुवातीच्या सामन्यात त्याला ही दुखापत झाली.

न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन म्हणाला, “विश्वचषकात आपल्या देशातून खेळणे ही नेहमीच अभिमानाची बाब असते. मी माझ्या संघाला मागच्या विश्वचषकात फायनलपर्यंत घेऊन गेलो होतो आणि ही गोष्ट माझ्यासाठी नेहमीच खास असेल. दुखापत बरी होण्यास किती वेळ लागेल किंवा मी कोणत्या दिवशी परत येईन या क्षणी फक्त अंदाज लावू शकतो. होय, अर्थातच आगामी विश्वचषकात खेळण्याची शक्यता खूपच कमी आहे परंतु, मला त्यात सहभागी होण्याची इच्छा आहे. त्यासाठी हे लक्ष्य पार करावे लागणार असून ते खूप कठीण आहे पण, विश्वचषकासारखी स्पर्धा मला यातून बरी होण्यास नेहमीच प्रेरित करते.”

He should focus on his batting and not hairstyle Adam Gilchrist slams Shubman Gill his failures
Shubman Gill : ‘हेअरस्टाइलवर नव्हे तर फलंदाजीवर लक्ष दे…’, अ‍ॅडम गिलख्रिस्टने ‘या’ भारतीय फलंदाजाला फटकारले
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Bumrah may lose out on Test captaincy
कसोटी कर्णधारासाठी दीर्घकालीन पर्यायाची गरज; बुमराच्या क्षमतेवरून निवड समितीमध्येच संभ्रम
NZ vs SL Sri Lanka beat New Zealand by 140 runs Mark Chapman 82 runs in 3rd ODI match at Eden Park
NZ vs SL : तिसऱ्या वनडेत श्रीलंकेने उडवला न्यूझीलंडचा धुव्वा, मार्क चॅपमनची खेळी ठरली व्यर्थ
Sunil Gavaskar opinion on Bumrah being a contender for the captaincy sport news
कर्णधारपदासाठी बुमराच दावेदार! नेतृत्वाच्या जबाबदारीचे दडपण घेत नसल्याचे गावस्कर यांचे मत
Varun Chakravarthy dominates Vijay Hazare Trophy for Champions Trophy 2025 Squad spot in Team India
Varun Chakaravarthy : केकेआरच्या फिरकीपटूचा टीम इंडियात प्रवेशासाठी दमदार दावा; राजस्थानचा निम्मा संघ धाडला माघारी
Pat Cummins likely to miss Champions Trophy 2025 due to ankle injury
Pat Cummins : चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी ऑस्ट्रेलियाला धक्का? ‘हा’ स्टार खेळाडू संपूर्ण स्पर्धेला मुकण्याची शक्यता
Rohit Sharma and Virat Kohli included in India squad for Champions Trophy ODIs
रोहित, विराटच्या समावेशाची शक्यता; चॅम्पियन्स करंडकासाठी राहुल, शमी, जडेजाबाबत संदिग्धता

हेही वाचा: IND vs WI: लिओनेल मेस्सी ते पंजाबी नातेवाईक; USAमध्ये पोहोचल्यावर खेळाडूंच्या मनात येणारी ‘ही’ आहे पहिली गोष्ट, पाहा Video

केन विल्यमसन इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत सामील होणार?

३३ वर्षीय विल्यमसन इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी न्यूझीलंड संघात सामील होणार आहे. मात्र, त्याची भूमिका ही फक्त संघाला पाठिंबा देण्याची असणार आहे. त्यात कितपत प्रत्यक्षात मैदानावर उतरून खेळणार याबाबत कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही. ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या या दौऱ्यात न्यूझीलंडचा संघ चार टी२० आंतरराष्ट्रीय आणि चार एकदिवसीय सामने खेळणार आहे.

विश्वचषक २०२३स्पर्धेसाठी न्यूझीलंडचा संघ या मालिकेनंतर भारतात येणार आहे. ५ ऑक्टोबरला इंग्लंडविरुद्ध पहिला सामना ते खेळणार आहे. वर्ल्डकपचा ​​हा उद्घाटन सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. २०२९ मध्ये विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात झाला होता. त्यानंतर इंग्लंडचा संघ चॅम्पियन झाला. सामना आणि सुपर ओव्हर यामध्ये यात बरोबरी झाल्याने चौकार आणि षटकार यांच्या निकालावर इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आले होते.

हेही वाचा: Asia Cup 2023: आशिया कपसाठी कॉमेंट्री पॅनेल जाहीर! गंभीर, रवी शास्त्री, वसीम अक्रम यांचा समावेश, ‘या’ स्टार समालोचकला वगळले

न्यूझीलंड ग्रुप स्टेजचे नऊ सामने खेळेल, तर सेमीफायनल १५ नोव्हेंबरपासून सुरू होईल. विल्यमसनने न्यूझीलंडच्या २०१५ आणि २०१९च्या मोहिमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. न्यूझीलंडला ५ सप्टेंबरपर्यंत विश्वचषकासाठी १५ सदस्यीय संघाची निवड करावी लागणार आहे. विल्यमसनच्या अनुपस्थितीत टॉम लॅथम संघाचे नेतृत्व करत आहे.

Story img Loader