Kane Williamson on World Cup 2023: केन विल्यमसनने शुक्रवारी कबूल केले की भारतात २०२३च्या आयसीसी विश्वचषक स्पर्धेत खेळण्याची त्याची शक्यता कमी आहे. न्यूझीलंडच्या या फलंदाजावर नुकतीच शस्त्रक्रिया झाली असून तो त्यातून सावरत आहे. विल्यमसनच्या गुडघ्याच्या आधीच्या क्रूसीएट लिगामेंटवर (ACL) या वर्षी एप्रिलमध्ये शस्त्रक्रिया झाली होती. अहमदाबादमध्ये चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्सकडून खेळताना आयपीएल २०२३च्या सुरुवातीच्या सामन्यात त्याला ही दुखापत झाली.
न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन म्हणाला, “विश्वचषकात आपल्या देशातून खेळणे ही नेहमीच अभिमानाची बाब असते. मी माझ्या संघाला मागच्या विश्वचषकात फायनलपर्यंत घेऊन गेलो होतो आणि ही गोष्ट माझ्यासाठी नेहमीच खास असेल. दुखापत बरी होण्यास किती वेळ लागेल किंवा मी कोणत्या दिवशी परत येईन या क्षणी फक्त अंदाज लावू शकतो. होय, अर्थातच आगामी विश्वचषकात खेळण्याची शक्यता खूपच कमी आहे परंतु, मला त्यात सहभागी होण्याची इच्छा आहे. त्यासाठी हे लक्ष्य पार करावे लागणार असून ते खूप कठीण आहे पण, विश्वचषकासारखी स्पर्धा मला यातून बरी होण्यास नेहमीच प्रेरित करते.”
केन विल्यमसन इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत सामील होणार?
३३ वर्षीय विल्यमसन इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी न्यूझीलंड संघात सामील होणार आहे. मात्र, त्याची भूमिका ही फक्त संघाला पाठिंबा देण्याची असणार आहे. त्यात कितपत प्रत्यक्षात मैदानावर उतरून खेळणार याबाबत कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही. ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या या दौऱ्यात न्यूझीलंडचा संघ चार टी२० आंतरराष्ट्रीय आणि चार एकदिवसीय सामने खेळणार आहे.
विश्वचषक २०२३स्पर्धेसाठी न्यूझीलंडचा संघ या मालिकेनंतर भारतात येणार आहे. ५ ऑक्टोबरला इंग्लंडविरुद्ध पहिला सामना ते खेळणार आहे. वर्ल्डकपचा हा उद्घाटन सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. २०२९ मध्ये विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात झाला होता. त्यानंतर इंग्लंडचा संघ चॅम्पियन झाला. सामना आणि सुपर ओव्हर यामध्ये यात बरोबरी झाल्याने चौकार आणि षटकार यांच्या निकालावर इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आले होते.
न्यूझीलंड ग्रुप स्टेजचे नऊ सामने खेळेल, तर सेमीफायनल १५ नोव्हेंबरपासून सुरू होईल. विल्यमसनने न्यूझीलंडच्या २०१५ आणि २०१९च्या मोहिमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. न्यूझीलंडला ५ सप्टेंबरपर्यंत विश्वचषकासाठी १५ सदस्यीय संघाची निवड करावी लागणार आहे. विल्यमसनच्या अनुपस्थितीत टॉम लॅथम संघाचे नेतृत्व करत आहे.