देशातील क्रीडा संघटना या उद्योजक आणि राजकीय नेत्यांच्या हातातील बाहुल्या झाल्या असून त्यांच्या मनमानी कारभारामुळेच खेळाडूंचे अतोनात नुकसान होत आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंग यांनी विविध खेळांवर हुकमत गाजविणाऱ्या राजकीय नेत्यांना अप्रत्यक्षरित्या घरचा आहेर दिला.
‘‘कोणत्याही खेळांच्या संघटनांचे सदस्यत्व हे फक्त खेळाडूंनाच दिले पाहिजे. तसेच या संघटनांचा कारभारही खेळाडूंकडेच सोपविला पाहिजे. गेली ३३ वर्षे मी हे मत मांडत आलो आहे. राजीव गांधी हे पंतप्रधान असताना त्यांनी हा विचार प्रामुख्याने मांडला होता.दिल्ली क्रिकेट संघटनेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत बिशनसिंग बेदी यांच्यासह अनेक खेळाडूंचा पराभव झाला आणि उद्योजक व राजकीय नेत्यांनी सत्ता मिळविली. ही खेळाच्या हितासाठी अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे,’’ असे ते म्हणाले.
राजकीय क्रीडा संघटकांना दिग्विजय यांचा ‘घरचा आहेर’
देशातील क्रीडा संघटना या उद्योजक आणि राजकीय नेत्यांच्या हातातील बाहुल्या झाल्या असून त्यांच्या मनमानी कारभारामुळेच खेळाडूंचे
First published on: 05-01-2014 at 07:21 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Digvijay singh criticises national sports convenor