१९८३च्या वर्ल्डकप विजयात मोलाचे योगदान देणारे माजी क्रिकेटपटू यशपाल शर्मा यांचे आज ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. यशपाल हे दिवंगत अभिनेते दिलीप कुमार यांचे मोठे चाहते होते. जेव्हा ते संघासमवेत हॉटेलमध्ये असायचे, तेव्हा ते दिलीप कुमार यांचा ‘क्रांती’ चित्रपट बघायचे. मात्र, त्यांचे ‘क्रांती’ चित्रपटाचे वेड पाहून इतर खेळाडू अस्वस्थ व्हायचे.

त्यामुळे संघातील इतर खेळाडू कोणत्या तरी कारणाने यशपाल यांना बाहेर पाठवायचे, जेणेकरून ते टीव्हीवर दुसरे काहीतरी पाहू शकतील. पण हाच खेळ त्यांच्या अंगउलट आला. यशपाल यांना क्रांती चित्रपटाचे इतके वेड होते, की त्यांनी एकदा टीव्हीच उचलून घेऊन गेला होता. माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांनी हा किस्सा ‘द कपिल शर्मा शो’च्या या कार्यक्रमात सांगितला होता. या कार्यक्रमात कपिल देव, मदन लाल, मोहिंदर अमरनाथ, सय्यद किरमानी, रॉजर बिन्नी आणि दिलीप वेंगसरकर हेदेखील उपस्थित होते.

Shiva
Video: आशू आणि शिवाच्या आयुष्यात दिव्यामुळे नवीन विघ्न? प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी केली विनंती, म्हणाले, “कृपया आता काही…”
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
star pravah new serial tu hi re maza mitwa starring sharvari jog and Abhijit amkar
नव्या मालिकांची मांदियाळी! ‘स्टार प्रवाह’वर पुनरागमन करतेय ‘ही’ लोकप्रिय अभिनेत्री, जाहीर केली मालिकेची वेळ अन् तारीख…
Thoda Tuza Ani Thoda Maza fame Sameer Paranjape propose to Shivani surve on aata hou de dhingana season 3
Video: ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’मधील तेजसने सोलापुरी भाषेत मानसीला केलं प्रपोज, म्हणाला, “बार्शी तिथं सरशी…”
Tharala Tar Mag Maha Episode Promo Out Arjun Propose to sayali
Video: अर्जुनचं ‘ते’ कृत्य पाहून प्रियाला बसला धक्का आता…; पाहा ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या महाएपिसोडचा प्रोमो
Savlyachi Janu Savli
Video: “मी ही बघतेच कशी…”, हळदीच्या कार्यक्रमात भैरवीचे सावलीच्या वडिलांना चॅलेंज; मालिकेत येणार ट्विस्ट
Savita Malpekar On Kiran Mane
“चॅनेलने किरणला ४ वेळा वॉर्निंग दिली, मग काढलं” मालिकेच्या सेटवर नेमकं काय घडलं? सविता मालपेकरांनी स्पष्टच सांगितलं…

या कार्यक्रमात संदीप पाटील म्हणाले, ”आम्ही १९८३मध्ये वर्ल्डकप खेळत होतो, तेव्हा एक क्रांती घडली. क्रांती चित्रपट त्यावेळी रिलीज झाला होता. सकाळ, दुपारी, संध्याकाळ क्रांती-क्रांती-क्रांती चित्रपट पाहिला जात होता. यशपाल शर्मा क्रांती घेऊन बसले. बलविंदर संधू यांनी एक आयडिया केली. त्यांनी यशपालला कोणाचा तरी फोन आला आहे, असे सांगून बाहेर पाठवले. योजनेनुसार मी कॉल केला आणि यशपाल कॉल घ्यायला गेला. तोपर्यंत क्रांतीची टेप बाहेर काढली आणि दुसरा चित्रपट लावला गेला. यशपाल दोन मिनिटांत परत आला आणि दुसरा चित्रपट पाहून त्याला धक्काच बसला. मग रागाच्या भरात त्याने टीव्ही उचलला आणि तो घेऊन गेला.”

हेही वाचा – १९८३च्या नायकाला गमावल्यानंतर ‘या’ क्रिकेटपटूंनी वाहिली श्रद्धांजली

यानंतर यशपाल शर्मा यांनी स्वत: याबाबतचे रहस्य सांगितले. रणजी खेळाडू असताना दिलीप कुमार यांनी त्यांचा एक सामना पाहिला होता. दिलीप कुमार त्यांच्या फलंदाजीमुळे प्रभावित झाले आणि राजसिंग डूंगरपूर यांच्याशी त्यांच्याबद्दल बोलणे केले. त्यानंतर यशपाल राष्ट्रीय संघात निवडले गेले. तेव्हापासूनच दिलीप कुमार यांच्यासोबत भावनिक संबंध असल्याचे यशपाल शर्मा यांनी सांगितले.