दिनेश गुंड

विनेश फोगटबाबत जे घडले, ते अत्यंत दुर्दैवी आहे. केवळ १०० ग्रॅमने वजन वाढल्याने ती ऑलिम्पिक पदकापासून वंचित राहिली. मात्र, नियमाला कोणीही अपवाद नाही.

Man putting hand inside crocodiles mouth crocodile shocking video
VIDEO: “कुणाच्याच संयमाचा अंत पाहू नका”, तरुणानं मगरीबरोबर केलेलं कृत्य पाहून तुम्हीच सांगा नेमकी चूक कुणाची?
2nd October Rashi Bhavishya & Panchang
२ ऑक्टोबर पंचांग: सर्वपित्री अमावस्या कोणासाठी ठरणार शुभ?…
Heroic Railway Employee Saves Young Woman from Suicide: Viral Video
आत्महत्या करण्यासाठी रेल्वे रुळाकडे धावली तरुणी, कर्मचाऱ्याने स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवले, धक्कादायक VIDEO VIRAL
Loksatta Chatura Can biological mother name be added instead of step mothes on the record
सावत्र आईऐवजी जैविक आईचे नाव लावणे हा मुलीचा अधिकारच!
Akshay Shinde Hearing
Akshay Shinde Encounter : “पिस्तुल खेचेल एवढी त्याच्यात ताकदच नव्हती”, वकिलांनी दिली कोर्टात माहिती; म्हणाले, “पालकांकडून त्याने ५०० रुपये…”
Boy teasing bull to over noise near his ear then bull revenge from boy shocking video
“काय गरज होती का?” बैलाच्या कानाजवळ वाजवला ताशा अन् शेवटी…; VIDEO पाहून तुम्हीच सांगा हे कितपत योग्य
readers comments on loksatta editorial readers reaction on loksatta articles
लोकमानस : लोकशाहीत टीका अविभाज्य घटक
loksatta editorial on union minister nitin gadkari says no more subsidies on electric vehicles
अग्रलेख : विजेला धक्का

आजचा खेळाडू खूप हुशार आणि प्रशिक्षणाच्या अत्याधुनिक सुविधांमुळे साक्षर झाला आहे. अशा घटना एखाद्या छोट्याशा चुकीमुळेच घडतात. ऑलिम्पिकच्या इतिहासात अशी घटना प्रथमच घडली असेल. मात्र, केवळ खेळाडूस दोष देणे योग्य नाही. यात प्रशिक्षक, आहारतज्ज्ञ आणि अन्य साहाय्यकांचीही तेवढीच जबाबदारी असते. वजन घटवण्यासाठी विनेश आणि सर्व साहाय्यकांनी खूप मेहनत घेतली. मात्र, स्पर्धेतील पहिल्या दिवसाच्या तुलनेत दुसऱ्या दिवशी वजन घटवण्यासाठी वेळ कमी असतो. याचा विनेशला निश्चितपणे फटका बसला.

आंतरराष्ट्रीय स्तरावर कारकीर्द घडवताना एका टप्प्यावर खेळाडूंसमोर वजनी गट बदलण्याचा निर्णय घेण्याची वेळ येते. पुरुष असो किंवा महिला, खेळाडूसाठी हा सर्वांत मोठा निर्णय असतो. वजनी गट बदलणे एकवेळ सोपे, पण तो टिकवणे अत्यंत अवघड. जागतिक आणि ऑलिम्पिक स्पर्धेत दोन दिवस लढती होत असतात. या दोन्ही दिवशी मल्लांचे वजन घेतले जाते आणि ते ज्या वजनी गटात खेळतात, तितकेच वजन असणे गरजेचे असते.

हेही वाचा >>> Vinesh Phogat Disqualified : तिचे पदक गेले; त्यांची पत… विनेशची संधी हुकल्याने हळहळ; व्यवस्थापनाच्या ढिलाईवर नाराजी

एखादा मल्ल जेव्हा आधीपेक्षा खालच्या वजनी गटाची निवड करतो, तेव्हा याचा आपल्या कामगिरीवर परिणाम होणार नाही याची त्याला काळजी घ्यावी लागते. विनेशला हे चांगले जमले. मात्र, दुसऱ्या दिवशी तिचे वजन अधिक आढळले. त्यामुळे वजन गट बदलल्यावर किंवा आपल्या नेहमीच्या वजनी गटातून खेळताना मल्लांनी आपण वजन कायम राखू शकतो का, वैयक्तिक कामगिरीवर फरक पडणार नाही ना आणि वजन नियंत्रित करताना सर्व गोष्टींना व्यवस्थित सामोरे जाता येईल का, ही काळजी घेणे आवश्यक असते.

पुरुष खेळाडू असो किंवा महिला, वजन कमी करणे किंवा वाढवणे हे पूर्णपणे खेळाडूच्या शरीररचनेवर अवलंबून असते. ज्या खेळाडूंच्या शरीरात चरबीचे (फॅट) प्रमाण अधिक असते ते व्यायाम, सॉना, आहाराचे नियोजन करून वजन कमी करू शकतात. मात्र, मुळातच ज्या खेळाडूने मोठ्या मेहनतीने शरीर पीळदार बनवलेले असते अशा खेळाडूंना वजन कमी करताना कठीण जाते. वजन तोडल्यानंतर ते अचानक स्पर्धेत वाढत असेल, तर त्याला सर्वस्वी खेळाडूचे आहार नियोजन अवलंबून असते. स्पर्धेत एकाच दिवशी सलग लढती खेळायच्या असतात. त्यामुळे खेळाडू ऊर्जा राखू शकला नाही, तर तो अपेक्षित निकाल देऊ शकत नाही. अशा वेळी वेळोवेळी शरीररचना लक्षात घेऊन आहार ठरवला पाहिजे. यात कुठे चूक झाली, तर अशा घटना घडतात. अशा वेळी ऊर्जा मिळवण्यासाठी वजन कमी केलेले खेळाडू चॉकलेट्स किंवा अन्य आहार घेतात. असेच काहीसे विनेशच्या बाबतीत घडल्याची शक्यता आहे.