भारतीय क्रिकेटपटू दिनेश कार्तिकच्या घरात दोन नव्या पाहुण्यांचे आगमन झाले आहे. कार्तिक दोन जुळ्या मुलांचा बाप बनला आहे. त्याने स्वतः सोशल मीडियावर ही माहिती दिली. कार्तिकने आपल्या मुलांची नावेही ठेवली आहेत. कार्तिकने पत्नी दीपिका पल्लीकलसोबत आपला फोटो शेअर केला. यात हे दोघे कबीर आणि झिआन या मुलांसह दिसत आहेत. आयपीएल २०२१मध्ये कार्तिक कोलकाता नाइट रायडर्स संघाचा भाग होता. तो या संघाचा कर्णधारही राहिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिनेश आणि दीपिका यांनी २०१३ मध्ये लग्नगाठ बांधली होती. दोघेही क्रीडापटू असल्याने ते बहुतेक घरापासून दूर असतात. दुखापतीमुळे सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमधून बाहेर पडल्यामुळे कार्तिक आपल्या नवजात मुलांसोबत वेळ घालवणार आहे. तो टी-२० स्पर्धेत तामिळनाडूचे नेतृत्व करणार होता. विजय शंकर आता या संघाचे नेतृत्व करणार आहे.

हेही वाचा – IPL 2022 : मुंबई इंडियन्सकडून हार्दिक पंड्याला ‘दे धक्का’..! दिल्ली ‘मुंबईकर’ क्रिकेटपटूला करणार संघाबाहेर?

२०१९ पासून राष्ट्रीय संघापासून दूर असलेला कार्तिक आता अर्धवेळ समालोचकही आहे. तो जूनमध्ये यूकेला गेला होता आणि तेथे तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ राहिला. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल आणि द हंड्रेड दरम्यान त्याने समालोचन केले. सध्या सुरू असलेल्या टी-२० वर्ल्डकपमध्ये तो क्रिकेट तज्ञ म्हणून काम करत आहे.

दीपिकाबद्दल बोलायचे झाले तर, तिने २०२०/२१ हंगामात सराव सुरू केला. ती २०२२ च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dinesh karthik and dipika pallikal become parents to twin boys adn