क्रिकेटपटू दिनेश कार्तिक आणि स्क्वॉशपटू दीपिका पल्लीकल यांचा लग्नसोहळा चेन्नईत बुधवारी पार पडला. या समारंभाला दोन्ही खेळाडूंच्या कुटुंबियांसह मित्रपरिवार उपस्थित होता. बुधवारी ख्रिश्चन पद्धतीने लग्न झाले असून, २० ऑगस्टला तेलुगू पद्धतीने या दोघांचे पुन्हा लग्न होणार आहे. दोन वर्षांपूर्वी या दोघांचा साखरपुडा झाला होता.

Story img Loader