भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात पुढील महिन्यात चार सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघ १ फेब्रुवारीला मुंबईत पोहोचण्याची शक्यता आहे. दरम्यान मार्नस लाबुशेनने आगामी भारत दौऱ्यासाठी त्याची बॅग पॅक केलेला फोटो शेअर केला आहे. या बॅगेत कॉफीच्या पॅकेट्स असल्याचे दिसत आहे. ज्यावर भारतीय फलंदाज दिनेश कार्तिकने टिप्पणी केली आहे.
मार्नस लाबुशेन अनेकदा सांगितले आहे की, तो क्रिकेटबद्दल जितका उत्साही आहे तितकाच तो कॉफीबद्दलही आहे. तो म्हणतो की त्याला कॉफी बनवण्याची प्रक्रिया कला कॉफी पिण्याइतकीच आवडते. मार्नस गार्डियनला म्हणाला होता की, “माझ्या २१व्या वाढदिवसाला मला कॉफी मशीन मिळाल्यापासून माझी कॉफीबद्दल आवड निर्माण झाली.”
मार्नसने बॅगेत कॉफीची पॅकेट्स ठेवलेल्या एक फोटो शेअर करताना, ट्विटमध्ये आपल्या चाहत्यांना एक प्रश्न विचारला आहे. त्याने कॉफीची किती पॅकेट्स आहेत? असा प्रश्न विचारला आहे. त्यावर भारतीय क्रिकेटपटू दिनेश कार्तिकने टिप्पणी केली आहे.
हेही वाचा – Lucknow Pitch: एकही षटकार न लगावला गेलेल्या खेळपट्टीबद्दल हार्दिक पांड्याने उपस्थित केला प्रश्न
या ट्विटवर भारतीय क्रिकेटपटू दिनेश कार्तिकने एक मजेशीर ट्विट केले, ज्याला भारतीय चाहत्यांनी पसंती दिली आहे. कार्तिकने लिहिले, “भारतात चांगली कॉफी देखील उपलब्ध आहे मित्रा.”
भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलिया कसोटी संघ: पॅट कमिन्स (कर्णधार), अॅश्टन अगर, स्कॉट बोलँड, अॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, पीटर हँड्सकॉम्ब, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन, लान्स मॉरिस, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मिचेल स्वीपसन, डेव्हिड वॉर्नर.
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील कसोटी मालिका २०२३ –
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया – पहिली कसोटी: ९ ते१३ फेब्रुवारी, नागपूर<br>भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया – दुसरी कसोटी: १७ ते २१फेब्रुवारी, दिल्ली
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया – तिसरी कसोटी: १ ते ५ मार्च, धर्मशाला य
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया – चौथी कसोटी: ९ ते १३ मार्च, अहमदाबाद