साऊथम्प्टन येथे सुरू असलेल्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यादरम्यान भारतीय यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांना हवामानासंबंधी सतत अपडेट देत असतो. आज म्हणजे या सामन्याच्या पाचव्या दिवशी सकाळीही कार्तिकने ट्वीट करत  चांगली बातमी दिली होती. त्याने आज पाऊस पडणार नसल्याचे सांगितले होते, मात्र सामना सुरू होण्याच्या काही वेळापूर्वी पावसाने आपले रूप दाखवायला सुरुवात केली. बदललेले हवामान पाहत कार्तिकला राग आला आणि त्याने रागाच्या भरातच एक ट्वीट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी

भारतीय चाहत्यांसाठी हवामान निरीक्षक बनलेल्या दिनेश कार्तिकने सामन्यापूर्वीच्या पावसाविषयी एका फोटोसह ट्वीट केले. कार्तिक आपल्या ट्वीटमधील फोटोत म्हणाला, ”नाही … वरुणदेव आमच्यासोबत हे करू शकत नाही”. त्याने या ट्वीटला एक कॅप्शनही दिले. आता हे सहन होण्यापलीकडे गेले आहे, असे कॅप्शन कार्तिकने या ट्वीटला दिले.

हेही वाचा – पाकिस्तान क्रिकेटमध्ये भूकंप, युनिस खानचा प्रशिक्षकपदाचा राजीनामा!

या सामन्यात आयसीसीकडून कमेंटरी पॅनेलमध्ये उपस्थित असलेला दिनेश कार्तिक दररोज सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांसह हवामानाची परिस्थिती सांगत असतो. पाचव्या दिवसाचा खेळ ४ वाजता सुरू झाला. आहे. आयसीसीने या सामन्यासाठी राखीव दिवसही ठेवला आहे. सामन्याचा पहिला आणि चौथा दिवस पावसामुळे पूर्णपणे धुऊन गेला आहे.