Dinesh Karthik appointed as England Lions batting consultant : बराच काळ टीम इंडियातून बाहेर असलेला अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने एक मोठं पाऊल उचललं आहे. दिनेश कार्तिक इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाचा फलंदाजी सल्लागार बनला आहे. दिनेश कार्तिक ‘भारत अ’ विरुद्धच्या सामन्यासाठी इंग्लंड लायन्सचा फलंदाजी सल्लागार बनला आहे. दिनेश कार्तिकचा कार्यकाळ १० जानेवारी ते १८ जानेवारी म्हणजेच केवळ नऊ दिवसांचा असेल.
कार्तिक आपला अनुभव इंग्लिश खेळाडूंबरोबर शेअर करणार –
भारत अ विरुद्धच्या या दौऱ्यासाठी इंग्लंडचे पुरुष एलिट, वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक नील किलीन यांची इंग्लंड लायन्स संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. रिचर्ड डॉसन आणि कार्ल हॉपकिन्सन यांच्याकडे सहाय्यक प्रशिक्षकाची जबाबदारी देण्यात आली आहे. इंग्लंडचा माजी फलंदाज इयान बेल देखील कार्तिकप्रमाणे फलंदाजी सल्लागार बनला आहे, तर ग्रॅम स्वानला संघाचा मार्गदर्शक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. दिनेश कार्तिक फलंदाजी सल्लागार म्हणून इंग्लंड लायन्सच्या खेळाडूंसोबत भारतीय परिस्थितीचा अनुभव शेअर करेल.
माजी इंग्लिश फलंदाज इयान बेल हे जानेवारीच्या मध्यापासून कार्तिकच्या जागी फलंदाजी सल्लागार म्हणून काम पाहतील आणि इंग्लंडचा माजी सहकारी ग्रॅमी स्वान संपूर्ण दौऱ्यासाठी मार्गदर्शक म्हणून काम करेल. बेल आणि स्वान हे २०१२ मध्ये भारताला एका कसोटी सामन्यात पराभूत करणाऱ्या इंग्लंड संघाचा भाग होते. या मालिकेत भारताचा २-१ने पराभव केला होता. या मालिकेतत ऑफस्पिनर स्वानने २० विकेट्स घेतल्या होत्या. त्याचबरोबर चौथ्या कसोटी सामन्यात फलंदाज इयाने बेलने शतक झळकावले होते.
इंग्लंड आणि भारत यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका –
भारत अ आणि इंग्लंड लायन्स यांच्यात १२ जानेवारी ते ४ फेब्रुवारी या कालावधीत चार सराव सामने खेळवले जाणार आहेत. या दौऱ्याची सुरुवात अहमदाबादमध्ये १२ आणि १३ जानेवारीला दोन दिवसीय सराव सामन्याने होईल आणि १७ जानेवारीपासून त्याच शहरात तीन चार दिवसीय सामने होतील. हा दौरा २५ जानेवारीपासून हैदराबाद येथे सुरू होणार्या सिनियर इंग्लंड संघाच्या भारतातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसोबतच सुरू राहील.
हेही वाचा – IND vs AFG 1st T20 : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामना कधी आणि कुठे विनामूल्य पाहता येणार? जाणून घ्या
भारत अ संघ : अभिमन्यू ईश्वरन (कर्णधार), बी. साई सुदर्शन, रजत पाटीदार, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), सरफराज खान, प्रदोष रंजन पॉल, कोना भारत (यष्टीरक्षक), पुलकित नारंग, मानव सुथार, नवदीप सैनी, तुषार देशपांडे, विद्वथ कवेरप्पा, आणि आकाश दीप.
हेही वाचा – Sandeep Lamichhane : बलात्कार प्रकरणात दोषी आढळल्याने नेपाळच्या क्रिकेटपटूला आठ वर्षांची शिक्षा
इंग्लंड लायन्स संघ: जोश बोहानन (कर्णधार), केसी अल्ड्रिज, ब्रायडन कार्स, जॅक कार्सन, जेम्स कोल्स, मॅट फिशर, कीटन जेनिंग्स, टॉम लॉस, अॅलेक्स लीस, डॅन मौसले, कॅलम पार्किन्सन, मॅट पॉट्स, ऑली प्राइस, जेम्स रीव्ह, ऑली रॉबिन्सन.