आयसीसी चॅम्पियन्स करंडक मालिकेसाठीच्या दोन्ही सराव सामन्यात दिनेश कार्तिकने शतक ठोकले. दिनेश कार्तिकच्या बॅटला इंग्लंडच्या मैदानांवर गवसेला सुर पाहता ६ जून पासून सुरु होणऱ्या सामन्यांसाठीच्या अंतिम भारतीय संघात दिनेश कार्तिक समावेश होण्याची शक्यता आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दरम्यान झालेल्या सराव सामन्यात ऑस्ट्रेलियन गोलंदाज मिचेल स्टार्कला भारतच्या फलंदाजीला आटोक्यात आणण्यात यश मिळाले होते. परंतु दिनेश कार्तिकने आपल्या पहिल्या सराव सामन्यासारखी संयमी फलंदाजीकरत शतक गाठले आणि ऑस्ट्रेलियाच्या विजयी होण्याच्या आशांना पुर्णविराम दिला. कॅप्टन कुल धोनीनेही दिनेशला साथ देत ताबडतोड फलंदाजी केली.
कार्तिक व धोनी यांनी सहाव्या विकेटसाठी २११ धावांची भागीदारी रचली आणि भारताने प्रथम फलंदाजी करत ५० षटकांत ३०८ धावा केल्या. दिनेशने १४० चेंडूत नाबाद १४६ धावा केल्या. दिनेश दोन्ही सामन्यात शतक ठोकून करंडकाच्या मुख्य सामन्यांसाठीच्या संघात आपले स्थान निश्चित करण्याचा प्रयत्न केलाय. दिनेशचा संघात समावेश झाल्यास, त्याच्यासमोर आपल्या फलंदाजीचे स्वरुप असेच कायम राखण्याचे आव्हान असणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा