SA20 Dinesh Karthik catch video viral : सध्या दक्षिण आफ्रिकेत एसए२० स्पर्धा खेळली जात आहे. टीम इंडियाचा माजी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकही या स्पर्धेच्या तिसऱ्या हंगामात खेळत आहे. डीके पार्ल रॉयल्सचे प्रतिनिधित्व करत आहे. स्पर्धेतील नववा सामना एमआय केपटाऊन आणि पार्ल रॉयल्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात दिनेश कार्तिकने अप्रतिम फिटनेस दाखवला वयाच्या ३९ व्या वर्षी यष्टीच्या मागे एक अप्रतिम झेल घेतला. या झेलचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

दिनेश कार्तिकने घेतला अप्रतिम झेल –

वास्तविक, दयान गालीम एमआय केपटाऊनच्या डावातील पाचवे षटक टाकत होता. अफगाणिस्तानचा अजमतुल्ला ओमरझाई त्याच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर स्ट्राइकवर होता. ओमरझाईला गालीमचा शॉर्ट बॉल फ्लिक करायचा होता. पण त्याला योग्य टायमिंग साधता आलं नाही आणि बॅटचा फेस लवकर बंद झाला. ज्यामुळे चेंडू बॅटच्या कडेला स्पर्श करुन मागे गेला. यावेळी यष्टीच्या मागे असलेल्या दिनेश कार्तिकने चपळाई दाखवली. त्याने उजव्या बाजून डायव्हिंग करत एका हाताने अप्रतिम झेल घेतला. ज्यामुळे अजमतुल्ला उमरझाईला ११ चेंडूत १३ धावा करुन माघारी जावं लागलं.

Kanpur couple reels of romance on moving bike
Kanpur Couple Video: रिल बनविण्यासाठी कपलचं बाईकवर अश्लील कृत्य, व्हिडीओ व्हायरल होताच पोलीस ॲक्शन मोडवर
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Fan who caught Kane Williamson's sixer with one hand wins Rs 90 lakh prize in SA20 2025 Match
SA20 2025 : मॅच पाहायला गेला आणि लखपती झाला, केन विल्यमसनच्या षटकाराने चाहत्याचं नशीब कसं बदललं?
Paaru
Video: संक्रातीच्या मुहुर्तावर सारंग-सावलीचे नाते फुलणार तर पारूवर येणार नवीन संकट, पाहा प्रोमो
Ajith racing accident
Ajith Kumar : साऊथ सुपरस्टार अजित कुमारचा मोठा अपघात, रेसच्या सरावदरम्यान क्रॅश झाली कार; दुर्घटनेचा Video Viral
Tirupati Balaji Pujari Fact Check in marathi
१२८ किलो सोनं, हिरे आणि कोट्यवधींची रोकड; तिरुपती बालाजी मंदिराच्या नावाने व्हायरल होणारा ‘तो’ video खरा की खोटा; वाचा सत्य
Tere Naam Actress Bhumika Chawla
Video : सलमान खानच्या ‘तेरे नाम’ चित्रपटाची हिरोईन २१ वर्षांनंतर ‘अशी’ दिसते; पतीसह साध्या लूकमध्ये दिसली भूमिका चावला
Young Vidarbha boys Cooks Vangi Rassa Bhaji & Bittya on Chulha
विदर्भातील तरुणांनी चुलीवर बनवली झणझणीत वांग्याची रस्सा भाजी अन् खुसखुशीत बिट्ट्या; VIDEO पाहून तोंडाला सुटेल पाणी

तत्पूर्वी या सामन्यात पारल रॉयल्सचा कर्णधार डेव्हिड मिलरने नाणेफेक जिंकून एमआय केपटाऊनला प्रथम फलंदाजी करण्यास आमंत्रित केले होते. केपटाऊनला फलंदाजीत फारसा प्रभाव पाडता आला नाही आणि त्यांनी २० षटकात ४ बाद १५८ धावाच करता आल्या. त्यांच्याकडून रॅसी व्हॅन डर ड्युसेनने सर्वाधिक ९१ धावा केल्या. पारल रॉयल्सचा सर्वात यशस्वी गोलंदाज मुजीब उर रहमान ठरला, ज्याने २७ धावांत २ विकेट्स घेतल्या.

हेही वाचा – Virat Kohli : ‘मी बॅट मागितली नव्हती, त्यानेच…’, गाबा कसोटी वाचवणाऱ्या आकाशदीपचा विराटच्या बॅटबद्दल मोठा खुलासा

पारल रॉयल्सच्या संघाने मारली बाजी –

यानंतर पार्ल रॉयल्सने १५९ धावांचे लक्ष्य १९ षटकांत ६ गडी राखून पूर्ण केले. रॉयल्सकडून लुआन ड्रे प्रिटोरियसने सर्वाधिक ८३ धावांची खेळी केली. याशिवाय कर्णधार मिलर २४ धावा करून नाबाद राहिला. दिनेश कार्तिकनेही फलंदाजीत १० धावांचे योगदान दिले. केपटाऊनकडून ट्रेंट बोल्ट आणि राशिद खान यांनी प्रत्येकी एक विकेट्स घेतली.

Story img Loader