Dinesh Karthik revealed that Ashwin was called up ahead of Washington Sundar: भारताचा अनुभवी फिरकी गोलंदाज आर आश्विन ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जात असलेल्या वनडे मालिकेचा भाग आहे. त्याने २१ महिन्यांनंतर वनडे क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आहे. त्याचबरोबर तो पुढील महिन्यात होणाऱ्या विश्वचषकासाठीच्या टीम इंडियाचा भाग असू शकतो. तत्पूर्वी यष्टिरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिकने आश्विनबाबत एक मोठा खुलासा केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिनेश कार्तिक म्हणाला की, फिरकी गोलंदाज आर अश्विनला आशिया चषक २०२३ च्या अंतिम सामन्यासाठी बोलावण्यात आले होते, परंतु त्याने नकार दिला होता. यानंतर वॉशिंग्टन सुंदरला बोलावण्यात आले आणि त्याने श्रीलंकेविरुद्ध अंतिम सामना खेळला. ज्यामध्ये टीम इंडियाने १० विकेट्सने विजय मिळवला आणि भारताने आठव्यांदा विजेतेपद पटकावले.

अश्विन सामना खेळण्यासाठी नव्हता तयार –

दिनेश कार्तिकने क्रिकबझशी बोलताना सांगितले की, अश्विनला आशिया कप २०२३ चा अंतिम सामना खेळण्यासाठी बोलावण्यात आले होते, परंतु तो या सामन्यासाठी तयार नव्हता. त्यामुळे संघात सामील होऊ शकला नाही. यानंतर अखेर अश्विनचा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला.

हेही वाचा – IND vs AUS: भारताविरुद्ध डेव्हिड वॉर्नरने केली खास कामगिरी, वनडे क्रिकेटमध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला सातवा ऑस्ट्रेलियन

दिनेश कार्तिक पुढे म्हणाला की, माझ्याकडे काही आतील माहिती होती आणि मी येथे रोहित शर्मा, अजित आगरकर आणि राहुल द्रविडचा बचाव करीन. त्याने खरेतर आशिया कप फायनलसाठी आर अश्विनला प्रथम बोलावले होते. त्यांच्यात संभाषणही झाले आणि अश्विनला वाटले की तो अद्याप अंतिम सामना खेळण्यास तयार नाही. त्यामुळे अक्षर पटेलच्या जागी वॉशिंग्टन सुंदरचा संघात समावेश करण्यात आला. अश्विनला बोलावण्यात आले, तेव्हा तो एनसीएमध्ये प्रशिक्षण घेत होता.

हेही वाचा – IND vs AUS 1st ODI: मोहम्मद शमीने पाच विकेट्स घेत मोडला ट्रेंट बोल्डचा विक्रम, भारतासाठी रचला नवा विश्वविक्रम

दिनेश कार्तिकने सांगितले की, आर अश्विनने नकार दिल्यानंतर वॉशिंग्टन सुंदरला बोलावण्यात आले. त्यावेळी आश्विन स्थानिक स्पर्धेत खेळत होता. त्याचबरोबर वॉशिंग्टन सुंदर एनसीएमध्ये होता. त्यामुळे सुंदरला श्रीलंकेविरुद्धच्या फायनलसाठी पाचारण करण्यात आले होते. फायनलसाठी अश्विन टीम इंडियाची पहिली पसंती असल्याचे कार्तिकने आवर्जून सांगितले. अश्विनने भारताकडून खेळलेल्या ११४ एकदिवसीय सामन्यांमध्ये १५२ विकेट घेतल्या आहेत. अश्विनने २१ महिन्यांनंतर भारतासाठी एकदिवसीय सामना खेळला आणि मोहालीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक विकेट घेतली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dinesh karthik revealed that ashwin was called up ahead of washington sundar for the asia cup final 2023 vbm