Champions Trophy 2025 Dinesh Karthik statement on Karun Nair : विजय हजारे ट्रॉफी २०२४-२५ चा दुसरा उपांत्य सामना विदर्भ आणि महाराष्ट्र संघांमध्ये वडोदराच्या मैदानावर खेळला गेला. या सामन्यात करुण नायरच्या नेतृत्वाखालील विदर्भ संघाने या स्पर्धेत आपली अपराजित मोहीम सुरू ठेवत हा सामना ६९ धावांनी जिंकून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. या विजयात करुन नायरची कामगिरी मोलाची ठरली. त्याने या स्पर्धेत सलग चार शतक झळकावली आहे. त्यामुळे त्याला पुन्हा एकदा टीम इंडियात संधी देण्याची मागणी सोशल मीडियावर होत आहे. अशात दिनेश कार्तिकने मोठं वक्तव्य केलं आहे.

दिनेश कार्तिक काय म्हणाला?

नुकतेच काही दिवसांपूर्वी दिनेश कार्तिकने क्रिकबझशी संवाद साधताना सांगितले की, सध्या करुण नायर टीम इंडियात परतण्याची शक्यता खूपच कमी आहे. खरं तर, काही रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात होता की त्याचा उत्कृष्ट फॉर्म लक्षात घेऊन भारतीय निवडसमिती चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कर्नाटकच्या या खेळाडूच्या नावावर विचार करत आहेत. यावर कार्तिक म्हणाला की चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजाला आगामी आयसीसी स्पर्धेत स्थान मिळणार नाही.

Harbhajan Singh react on dressing room conversation leak
Harbhajan Singh : ‘सर्फराझने ड्रेसिंग रूमच्या गोष्टी लीक केल्या असतील तर कोचने…’, हरभजन सिंगची संतप्त प्रतिक्रिया
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Uday Samant On Thackeray group
Uday Samant : उद्धव ठाकरेंना धक्का बसणार? शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “पुढच्या आठ दिवसांत ठाकरे गटातून…”
BCCI New Rules for Team India
BCCI New Rules : BCCI ने अखेर उचलले मोठे पाऊल! भारतीय खेळाडूंसाठी जारी केले १० कठोर नियम, पाहा यादी
Maharashtra Live News Updates in Marathi
Saif Ali Khan Health Updates : सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी अद्याप कोणीही ताब्यात नाही; मुंबई पोलिसांची माहिती
Narayangaon Pune Accident 9 people died
Narayangaon Pune Accident : पुण्यातील नारायणगाव येथे ट्रकने कारला उडवले, ९ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या वारसांना मदत जाहीर
Manu Bhaker and D Gukesh received Khel Ratna Award
Khel Ratna Award 2024 : मनू भाकर आणि डी गुकेश खेलरत्न पुरस्काराने सन्मानित, ‘या’ खेळाडूंना मिळाला अर्जुन पुरस्कार
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

चॅम्पियन्स ट्रॉफी संघात स्थान मिळणार नाही –

दिनेश कार्तिक म्हणाला, “करुण नायर, सध्या अप्रतिम फॉर्ममध्ये आहे. पण त्याची ही कामगिरी अशा वेळी आहे, जेव्हा भारतीय एकदिवसीय संघ जवळपास निश्चित झाला आहे. त्यामुळे त्यात खूप बदल होण्याची शक्यता फारच कमी आहे. तरी त्याला संघात संधी मिळाली तरी उत्तमच असेल. कारण त्याला आपले नाव निवडसमितीच्या निदर्शनास आणण्यात नक्कीच यश मिळाले आहे. मात्र, मला वाटत नाही की तो चॅम्पियन्स ट्रॉफी संघात स्थान मिळवेल. पण जर तो अशीच कामगिरी पुढे करत राहिला, तर मला खूप आनंद होईल. कारण तो एक असा फलंदाज आहे, जो वेगवान आणि फिरकी गोलंदाजी चांगल्या प्रकारे खेळतो.

हेही वाचा – Khel Ratna Award 2024 : मनू भाकर आणि डी गुकेश खेलरत्न पुरस्काराने सन्मानित, ‘या’ खेळाडूंना मिळाला अर्जुन पुरस्कार

दुसऱ्या उपांत्य सामन्यात प्रथम फलंदाजी करताना विदर्भ संघाने ५० षटकात ३ गडी गमावून ३८० धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात लक्ष्याचा पाठलाग करताना महाराष्ट्र संघाला ५० षटकात ३११ धावांपर्यंत मजल मारता आली. आता १७ जानेवारीला विजेतेपदाच्या लढतीत विदर्भाचा संघ कर्नाटक संघाशी भिडणार आहे.

Story img Loader